फोटो सौजन्य - Social Media
कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करताना काही चुका टाळणे फार आवश्यक आहे. या चुका केल्यास सामाजिक क्षेत्रात आपले नाव कमी होतेच. त्याचबरोबर याचा प्रभाव आपल्या करिअरवरही पडण्याची दाट शक्यता असते. जर तुम्हाला तुमचे भविष्य प्रिय आहे तर ‘या’ चुकांना पांघरून घालू नका. करत असाल तर आताच त्यावर आळा घाला.
वेळेचे पालन करणे फार महत्वाचे असते. दररोज येण्यास उशीर करणे याचा अर्थ तुम्हाला जबाबदारी सांभाळता येत नाही किंवा तुम्ही मुद्दामून या कडे दुर्लक्ष करत आहात. अशा वेळी वेळेच्या आधी आणि लवकर येण्यापेक्षा वेळेवर आलेले कधीही उत्तम असते. स्वतःचे नीट वेळेचे नियोजन असू द्या. दीलेली कामे सोडून प्रत्येक वेळी गप्पा गोष्टी करणे, एकमेकांविषयी चर्चा करणे अशा गोष्टी करणे टाळा. फार बोलण्याची सवय असेल तर आधी सवय बदला. कामाच्या ठिकाणी कामाचं बोला, उगाच वायफळ बडबड टाळा. पण उगाच घुम्या होऊ नका, सगळ्यांशी नीट संवाद ठेवा.
इतरांच्या खाजगी आयुष्यात फार घुसू नका. कामावर आला आहात मग कामापुरतेच संबंध ठेवणे उत्तम! कुणाच्या खाजगी आयुष्यात खोल घुसणे टाळा. कामावर जास्त कामाकडे लक्ष असू द्या. स्मार्टफोनचा वापर कमी करा. नेहमी स्मार्टफोनवर असणे तुमच्या परफॉर्मन्ससाठी चांगले नाही. स्मार्टफोन कमी वापरा पण त्यावर आलेले संदेश याकडे लक्ष नियमित असू देत. काही तरी महत्वाचे आणि कामाचेही असू शकतात. एकमेकांना सल्ला द्या पण सल्ला कधीही चुकीचा नकोय. अशा वातावरणात प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते पण अशामध्ये इतरांचे पाय खेचण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. इतरांना त्यांची शर्यत खेळू द्या, तुम्ही तुमची शर्यत कशी खेळता येईल? यावर लक्ष द्या.
कामावर सगळ्यांशी मिळून मिसळून रहा. एकमेकांशी संवाद असू द्या. संवाद वायफळ नसावा, याची दक्षता घ्या. पण एकमेकांशी चांगले संबंध ठेवल्यास कामही उत्तम रित्या पूर्ण होतात.