Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Paid Internship 2026: संरक्षण क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

DRDO Paid Internship 2026: डीआरडीओ (DRDO) अंतर्गत हैदराबाद येथील डिफेन्स मेटालर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये ६ महिन्यांची पेड इंटर्नशिप सुरू झाली आहे. अंतिम वर्षाच्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 03:59 PM
DRDO

DRDO

Follow Us
Follow Us:

DRDO Paid Internship 2026: संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या हैदराबाद येथील ‘डिफेन्स मेटालर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी’ने (DMRL) वर्ष २०२६ साठी ६ महिन्यांचा पेड इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केला आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे, तसेच निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल.

उमेदवार १५ जुलै २०२६ पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही इंटर्नशिप अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात (Last Year) शिकत आहेत. या काळात विद्यार्थ्यांना संरक्षण संशोधनाशी संबंधित प्रकल्पांवर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर डीआरडीओकडून प्रमाणपत्र देखील दिले जाईल.

कोण करू शकते अर्ज?

या इंटर्नशिपसाठी केवळ एआयसीटीई (AICTE) किंवा युजीसी (UGC) मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थीच अर्ज करू शकतात. यामध्ये खालील विद्यार्थी पात्र आहेत:

बीई, बीटेक, एमई, एमटेक आणि एमएससीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतच्या सर्व सेमिस्टरमध्ये किमान ७.० सीजीपीए (7.0 CGPA) असणे आवश्यक आहे.

तर पोस्ट ग्रॅज्युएट अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षात किमान ७० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

याशिवाय, ३१ जुलै २०२६ पर्यंत उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे.

TET 2026 Paper Leak: सुरक्षेतील मोठी चूक! महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणाचे धक्कादायक ‘आग्रा कनेक्शन’ उघड

स्टायपेंड किती मिळणार आणि इंटर्नशिप कधी सुरू होणार?

ही इंटर्नशिप ६ महिन्यांची असेल आणि तिची सुरुवात ५ ऑगस्ट २०२६ पासून होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. या स्टायपेंडची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. पहिला हप्ता तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण होऊन प्रोजेक्टचे मूल्यांकन झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जाईल. जर काही कारणास्तव इंटर्नशिप ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालली, तर वाढीव कालावधीसाठी कोणताही अतिरिक्त स्टायपेंड दिला जाणार नाही.

अर्ज कसा करावा?

१. या इंटर्नशिपसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. सर्वात आधी उमेदवारांनी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करावा.
२. फॉर्म भरल्यानंतर कॉलेजचे रेफरन्स लेटर (Reference Letter) आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून hrd.dmrl@gov.in या ईमेल आयडीवर ईमेल करावीत.
३. ईमेल पाठवताना सब्जेक्टमध्ये (Subject) ‘Application for paid internship 2026, DMRL Hyderabad (BRANCH CODE)’ असे लिहिणे बंधनकारक आहे. यामध्ये (BRANCH CODE) च्या जागी तुमच्या शाखेचा कोड लिहावा. या प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क (Application Fee) आकारले जाणार नाही.

Indian Army Result 2026: भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ परीक्षेचा निकाल जाहीर; येथे पाहा मेरिट लिस्ट आणि स्कोरकार्ड

निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांची निवड मुख्यत्वे त्यांच्या शैक्षणिक रेकॉर्ड आणि गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाईल. आवश्यकता भासल्यास डीआरडीओ ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखत (Interview) देखील घेऊ शकते. अर्जासोबत पूर्ण भरलेला अर्ज, मागील सेमिस्टरची गुणपत्रिका, ओळखपत्राची प्रत, कॉलेजचे रेफरन्स लेटर आणि बायोडाटा (Resume) पाठवणे आवश्यक आहे.

Web Title: Drdo paid internship 2026 hyderabad stipend engineering science students apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • DRDO
  • pm internship scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.