फोटो सौजन्य - Social Media
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), ही अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणारी एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या संस्थेने नुकतीच टेक्निशियन (ग्रेड II) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीतून देशभरातील विविध ठिकाणी, विशेषतः हैदराबाद येथील ECIL मुख्यालयात एकूण 45 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत संकेतस्थळावर 16 मे 2025 पासून 16 जून 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ही भरती आयटीआय (ITI) पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या आकर्षक नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीस चांगले वेतन, पदोन्नती संधी आणि सरकारी लाभ मिळतात. निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिला टप्पा संगणक आधारित परीक्षा (CBT) असेल ज्याला 85% गुणांचे वजन असेल आणि दुसरा टप्पा ट्रेड टेस्टचा असेल ज्याला 15% वजन दिले जाईल.
आरक्षणानुसार वयात सवलती देण्यात येणार आहेत. SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे, OBC (NCL) साठी 3 वर्षे, दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे वयोमर्यादा सवलत आहे. माजी सैनिकांना त्यांच्या सेवेच्या कालावधीसह 3 वर्षांची सवलत दिली जाईल. ECIL मध्ये ठरावीक कालावधीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे, याशिवाय प्रवर्गानुसार सवलत लागू राहील.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
ECIL टेक्निशियन ग्रेड II भरती 2025 ही एक स्थिर आणि सुरक्षित सरकारी करिअरची संधी आहे. सर्व पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये. या भरतीबद्दलची अधिक माहिती जाऊन घेण्यासाठी सूत्रसाइट www.ecil.co.in वर भेट द्यावी.