Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी! उच्च व तंत्रशिक्षणात परिवर्तनशील उपक्रम

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्राने उच्च व तंत्रशिक्षणात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करत महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • “Goodbye 2025” या संकल्पनेतून उच्च शिक्षण व्यवस्थेत दर्जात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प
  • लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन पातळीवरही विविध सुधारणा
  • ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ (ZPADD) ही विशेष मोहीम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत देशातील शिक्षण व्यवस्थेत ऐतिहासिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून, महाराष्ट्र राज्याने या धोरणाची प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करत उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि संशोधनाभिमुख शिक्षण व्यवस्था उभारण्यावर राज्य शासनाचा भर आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (GER) वाढवून जागतिक दर्जाचे शिक्षण भारतातच उपलब्ध करून देणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्रात विविध परिवर्तनशील उपक्रम राबवले जात आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन, विद्यार्थ्यांना समान संधी, संशोधनाला चालना देणे आणि कौशल्यविकास या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने “Goodbye 2025” या संकल्पनेतून उच्च शिक्षण व्यवस्थेत दर्जात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन पातळीवरही विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत.

MBA/PGDM मध्ये प्रवेश घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! NICMAR ने ‘या’ तारखेपर्यंत वाढवली मुदत

प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ (ZPADD) ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यात यश आले असून प्रशासकीय कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. राज्यात शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्याच्या दृष्टीने देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सुमारे एक हजार एमओओसी (MOOC) तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली जेनेरिक’ हा अभ्यासक्रम मराठी भाषेत विकसित करण्यात आला असून, तो ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि तक्रार निवारणासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक (अकृषी) विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांसाठी विशेष धोरण तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण संरक्षणावर या समितीचा विशेष भर आहे.

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक! तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून

तसेच, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जा मूल्यांकनातही महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यातील ४१ विद्यापीठे आणि सुमारे २७०० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले असून, एकूण २७४१ उच्च शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. एकूणच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि परिवर्तनशील बदल घडताना दिसत असून, विद्यार्थीहित केंद्रस्थानी ठेवून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा राज्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.

Web Title: Effective implementation of the new education policy in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक!  तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून
1

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक! तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून

रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजन; ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन
2

रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजन; ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन

श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर कार्यशाळा उत्साहात पार
3

श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर कार्यशाळा उत्साहात पार

परदेशात जाऊन घ्यायचंय शिक्षण? मग कशाला घेताय टेन्शन! ‘हे’ कोर्सेस करा
4

परदेशात जाऊन घ्यायचंय शिक्षण? मग कशाला घेताय टेन्शन! ‘हे’ कोर्सेस करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.