Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khed Zilla Parishad Schools: विद्यार्थी गेले, शाळांना टाळे! खेड तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळा बंद

Khed Zilla Parishad Schools: खेड तालुक्यात विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, रोजगारासाठी होणारे कुटुंबांचे स्थलांतर आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल याचा जिल्हा परिषद शाळांना फटका बसत आहे. पुरेसे विद्यार्थी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 04:27 PM
विद्यार्थी गेले, शाळांना टाळे! खेड तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळा बंद

विद्यार्थी गेले, शाळांना टाळे! खेड तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळा बंद

Follow Us
Follow Us:
  • खेडच्या ग्रामीण शिक्षणासमोर मोठे संकट
  • घटत्या पटसंख्येमुळे 8 जिल्हा परिषद शाळा बंद
  • स्थलांतर अन् इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव
खेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवरच आता बंद होण्याची वेळ आली आहे. विद्यार्थीसंख्या घटल्याने खेड तालुक्यातील ८ प्राथमिक शाळांचे कामकाज बंद करण्यात आले असून, या शाळांतील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पटसंख्या पाचपेक्षा कमी झालेल्या किंवा एकही विद्यार्थी शिल्लक नसलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. यामध्ये निगडे-कदमवाडी, तुळशी-घाणेकरवाडी, सापिर्ली-मराठवाडी, आंबवली-धनगरवाडी, धामणंद-बौद्धवाडी, खोपी-गुरववाडी आणि कुंभाड-गवळीवाडी या शाळांचा समावेश आहे.

ZP School study tour Hyderabad: राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ‘या’ विद्यार्थ्यांची निवड

शिक्षकांचेही रिक्त पदे

रोजगारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांकडे होणारे ग्रामीण भागातील स्थलांतर, तसेच पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल, यामुळे गावांतील शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. दुर्गम वाड्यांमधील शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. बंद झालेल्या शाळांतील मोजक्या विद्यार्थ्यांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शिक्षकांचेही रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याची गरज

गावातील शाळा बंद होणे ही केवळ पटसंख्येची बाब नसून ग्रामीण शिक्षणव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान आहे. शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असताना जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा एकेक करून गावातील शाळांच्या इमारती उभ्या राहतील आणि वर्गखोल्यांमध्ये मात्र विद्यार्थ्यांऐवजी शांतता दिसेल.

राज्यभरही जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधील घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव, मुलांची कमी होत असलेली संख्या आणि शहरांकडे होणारे स्थलांतर ही पटसंख्या घसरण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे विविध जिल्ह्यांतील परिस्थितीतून दिसते. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षणाचा दर्जा, डिजिटल शिक्षण, इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन, शाळांमधील मूलभूत सुविधा आणि पालकांशी सातत्याने संवाद या बाबींवर भर देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उद्दिष्टांमध्येही शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे, 100 टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट गाठणे आणि स्थलांतरित मुलांसाठी पर्यायी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

AI in ZP School: जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल! एआयच्या मदतीने तयार केले ॲनिमेटेड व्हिडिओ

Web Title: Eight zilla parishad schools closed in khed student enrollment decline rural education crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Khed
  • School
  • ZP School

संबंधित बातम्या

पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
1

पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
2

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.