
Eklavya Competitive Entrance Exams for Tribe Students
डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका/महानगरपालिका व शासनमान्य शाळांमध्ये सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ५वी ते ८वीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतील. एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी, विद्यार्थी अनुसूचित जमाती /आदिम जमातीचा असावा, त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. अर्ज मिळण्याची व सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.
अर्ज निःशुल्क असून भरलेला अर्ज संबंधित एकलव्य शाळेतच जमा करावा, असे आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले आहे. गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षणासाठी ही एक सुवर्णसंधी असून पालक व मुख्याध्यापकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असेही आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले आहे.
मुंबई. कालिंदी आणि मुंबई येथून प्रकाशित होणारे नर्मदा तिथी पंचांग दिनदर्शिका नुकतीच पश्चिमं रेल्वे मुख्यालय कमर्शियल चर्चगेट, मुंबई येथे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या हस्तै प्रकाशित करण्यात आली, यावेळी ओम प्रकाश रावल, संपादक डॉ. चंद्रेश जोशी, राजेश अग्रवाल, अनुराधा पोतदार झवेरी, पं. राजेश घनश्याम जोशी आणि मुकेश मेहता उपस्थित होते. संपादक डॉ चंद्रेश जोशी यांनी म्हटले की, ही दिनदर्शिका सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा, चंद्र तारखा आणि नक्षत्र, व्रत आणि सणांची अचूक माहिती सहज समजेल अशा पद्धतीने प्रदान करते.
तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह