तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू...! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Amravati News: १ जानेवारीपासून ‘या’ जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त’, बालविवाह झाल्यास होणार कारवाई
ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये योग्य वैद्यकीय साधन सामग्रीची आणि तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता आहे, गर्भवती महिलांसाठी आपत्कालीन सुविधा असलेल्या केंद्रांचा अभाव तसेच मुलीच्या जन्माला येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील चिंताजनक आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे. आरोग्य विभागाने या गंभीर समस्येचे गांभीर्य ओळखून पुढील काळात जिल्हह्यात अधिक तत्परतेने उपचार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
तथापि, आरोग्य सेवांचा सुधारण्ड करण्यासाठी सरकारी निधी व व्यवस्थापनाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. यात लक्ष वेधून घेणारी बाब महणजे, खाजगी रुग्णालये व वैद्यकीय केंद्रे मध्ये उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने झाल्याचे समोर आले आहे. आता ग्रामीण रुग्णालयांनी जिल्ह्यात २७स्त्रीरोग तज्ज्ञाची नेमणूक करून पालघर आणि जव्हार या ठिकाणी शासकीय रक्तपेढीची उभारणी केली आहे. शिवाय डहाणू आणि कासा, वाडा येथे ब्लड स्टोरेज व्यवस्था उभी केली आहे. अति जोखमीच्या अल्पवयीन मातांची सोनोग्राफी करून प्रसूतसाठी शस्त्रक्रिया केंद्र जव्हार, कासा, डहाणू, पालघर, मनौर, वाहा येथे उभारणी कैले आहे. यामुळे गर्भवती महिलांचं मृत्यूचे प्रमाण घटले आहे.
गर्भवती महिलांचा मृत्यु
मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०११ मध्ये पालघरमध्ये १५ गरदोर महिलांचा मृत्यू झाला होता, तर २०२२ मध्ये ५५ गरदोर महिला आणि २०२३ मध्ये ६५ गरदोर महिलांचा मृत्यू झाला होता. ही संख्या वाढत चालल्याने चिंता निर्माण झाली आहे.
पालघरचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी म्हटले की, २०११ ते २०२१ च्या कालावधीत स्त्री रोग तज्ज्ञ आणि शासकीय रक्तपेढी उपलब्धबाबत समस्या होती. आता शासनाने मृत्यू प्रमाण घटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आवश्यक प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत






