Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात बेरोजगारीचा टक्का घसरला? मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाढ, भरतीचा आला तुफान

देशामध्ये बेरोजगारीचा टक्का घसरत चालल्याचे निदर्शनास आले आहे. काही महत्वाच्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी यंदा वाढलेली दिसून येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 15, 2025 | 02:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • बेरोजगारीचा टक्का बऱ्यापैकी घसरत चालला
  • 2025 मधील पहिल्या 10 महिन्यांत भरती गेल्या वर्षापेक्षा चांगली
  • आयकर कपातीमुळे शहरी मागणी वाढ
गेल्या काही वर्षांपासून देशात वाढत्या लोकसंख्येमुळे स्पर्धेत वाढ झाली आहे आणि याचा परिणाम बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणाच्या रूपात (Career News) दिसत आहे. पण या वाढत्या प्रमाणात आता कुठे पूर्णविराम दिसल्याचे चित्रण दिसून येत आहे. ते कसे? कारण देशात बेरोजगारीचा टक्का बऱ्यापैकी घसरत चालला आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे देशातील काही बड्या कंपन्यांमध्ये झालेली कर्मचाऱ्यांची वाढ! यंदाच्या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त भरती झाल्या आहेत आणि जास्त उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. 2025 मधील पहिल्या 10 महिन्यांत भरती गेल्या वर्षापेक्षा चांगली. एचएसबीसी इंडिया पीएमआयच्या ‘जॉब्स’ घटकाचे मूल्य 52.5 वरून 53.8 वर आले आहे. (Recruitment News)

विलेपार्ले महिला संघ ग्रंथालयात निबंध स्पर्धा जाहीर! ३१ डिसेंबर अंतिम तारीख

‘या’ काही कारणामुळे कंपन्यांची भरती वाढली आहे

भरती वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मजबूत ऑर्डर पाइपलाइन, नवीन गुंतवणूक आणि सततची वाढणारी मागणी! त्याचबरोबर जीएसटी आणि आयकर कपातीमुळे शहरी मागणी वाढ, घटती महागाई आणि कमी व्याजदरांमुळे खरेदी वाढणे, अॅल्युमिनियम, जस्त, तांबे, चांदी यांसारख्या धातू क्षेत्रातील नवीन गुंतवणुका वाढणे, हरित ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात विस्तार होणे या सगळ्या बाबींमुळे देशातील बड्या कंपन्यांमध्ये रोजगार वाढला आहे. तसेच स्थानिक सोर्सिंगमुळे देशातील अनेक भागात स्थानिक रोजगाराला दिशा मिळत आहे. (Employment Level in India)

देशामध्ये भरतीचे तुफान आणणाऱ्या कंपन्यांमध्ये KEC इंटरनॅशनल, RPG ग्रुप तसेच वेदांत ग्रुपचा समावेश आहे. जानेवारीपासून ते सप्टेंबरपर्यंत KEC इंटरनॅशनलने जवळजवळ १५०० पेक्षा जास्त उमेदवारांना रोजगार दिला आहे. तर RPG ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १३% ने वाढली आहे तर वेदांत ग्रुपमध्ये १५% ते १८% वाढ दिसून आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये भीती! व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांना बारावीचा फॉर्म भरता येणार नाही

आजच्या वाढत्या भरतीचा परिणाम भविष्यातील भरतीच्या प्रमाणावर होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यात रोजगाराचे प्रमाण आणखीन वाढेल अशी अपेक्षा सगळे मनात ठेवून आहेत. कामगार दल सहभाग दर (LFPR) सप्टेंबरमध्ये 55.3% होता आणि हा गेल्या पाच महिन्यांतील सर्वोच्च स्तर आहे. मजबूत विक्री कामगिरी व मागणी वाढीच्या अंदाजामुळे कंपन्या कर्मचारी वाढवत आहेत असे तज्ज्ञांकडून म्हंटले जात आहे. उत्पादकता कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यातील वाढीसाठी कंपन्यांचे धोरणात्मक नियोजनदेखील या सगळ्या बाबींना फार कारणीभूत आहे.

Web Title: Employment opportunities in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय
1

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय

शाळा वाचविण्यासाठी सर्व एकवटले! शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा आरोप
2

शाळा वाचविण्यासाठी सर्व एकवटले! शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा आरोप

भरतीबाबत नवा निर्णय! शिक्षक भरती व पदस्थापना प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेच्या ताब्यात
3

भरतीबाबत नवा निर्णय! शिक्षक भरती व पदस्थापना प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेच्या ताब्यात

Chh Sambhajinagar News : दोन तपानंतर भेटले शालेय मित्र-मैत्रिणी! भावनिक प्रतिसाद, आठवणींना मिळाला उजाळा
4

Chh Sambhajinagar News : दोन तपानंतर भेटले शालेय मित्र-मैत्रिणी! भावनिक प्रतिसाद, आठवणींना मिळाला उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.