Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद; गुणवत्तावृद्धीसाठी विशेष आराखडा तयार केला जाणार

चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व शाळांसाठी बंधनकारक करण्यात आल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी उपलब्ध होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 09:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा देण्याची समान संधी
  • कोणते जिल्हे आणि तालुके शैक्षणिक गुणवत्तेत मागे आहेत
  • गरज भासल्यास संबंधित शिक्षकांना ‘डायट’तर्फे विशेष प्रशिक्षण देण्याचीही तरतूद
राज्यातील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या आधारे दरवर्षी शिक्षकांच्या कार्यक्षमता मूल्यांकनाची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत आणि गोपनीय अहवालात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.

सी-टीईटी 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

राज्य सरकारने प्रज्ञावान विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या पायाभरणीसाठी महत्त्वाची मानली जाते. २०२६–२७ पासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी नियमितपणे घेण्यात येणार असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना ती देणे अनिवार्य असेल. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा देण्याची समान संधी मिळणार आहे.

या निर्णयामुळे कोणते जिल्हे आणि तालुके शैक्षणिक गुणवत्तेत मागे आहेत, हे स्पष्टपणे समोर येणार आहे. गुणवत्तेत पिछाडीवर असलेल्या भागांसाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल. शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकनही शिष्यवृत्ती परीक्षेतील कामगिरीवर आधारित असल्याने त्या-त्या शाळांमधील अध्यापनाची पातळी सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबवता येणार आहेत. गरज भासल्यास संबंधित शिक्षकांना ‘डायट’तर्फे विशेष प्रशिक्षण देण्याचीही तरतूद केली आहे. राज्यातील ३३ पैकी २७ जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क सेस फंडातून भरले जाते. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १२५ रुपये आणि इतर विद्यार्थ्यांसाठी २०० रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले असून, हे शुल्क स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सेस फंडातून भरावे, असा प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे.

विवेक विद्यालयाचा क्रीडा महोत्सव उत्साहात; ‘यलो हाऊस’ विजेता, पालकांसाठीही बटाटा शर्यत!

या संपूर्ण प्रक्रियेमुळे शिक्षकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांची एकूण शैक्षणिक पातळी उंचावण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

Web Title: Entry in teachers service books based on scholarship exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:26 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
3

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
4

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.