Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…

CET: सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 09:22 PM
सोशल मीडियातील अकाऊंटकर्त्यावर कायदेशीर कारवाई

सोशल मीडियातील अकाऊंटकर्त्यावर कायदेशीर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्यास खैर नाही
  • सीईटी कक्ष कडक कारवाईच्या तयारीत
  • टास्क फोर्स ठेवणार लक्ष; एका युट्यूबरला नोटीस
पुणे/CET: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अलीकडच्या काळात सीईटी कक्षाच्या प्रवेश परीक्षा, (Career) वेळापत्रक, परीक्षेचे निकाल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाबाबत अनेकदा दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती/ दावे प्रसिद्ध केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
अशा प्रकारच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. तसेच सीईटी कक्षाच्या प्रतिमेस बाधा होत असते. यावर सीईटी कक्ष देखरेख ठेऊन चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या एक्स, फेसबुक, यूट्यूब व व्हॉट्सॲप या सोशल मीडियातील अकाऊंटकर्त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.

टास्क फोर्स ठेवणार लक्ष

सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थी व पालक यांनाही आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर सीईटीच्या संबंधित काही चुकीची माहिती/पोस्ट, रील, पॉडकास्ट, व्हिडीओ व आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास
तसेच  परीक्षा  केंद्रे बदलून देण्याचा दावा करणे, पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील तक्रारी असतील तर socialmedia.complaints@mahacet.org याच ईमेलवर पाठवून द्याव्यात. या तक्रारीची सीईटी कक्ष सत्यता पडताळून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

RMS CET 2026: राष्ट्रीय मिलिट्री स्कूल प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!

एका युट्यूबरला नोटीस

डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर शिवा नामक युट्यूबरने एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षेच्या तारखा, त्याच्या अर्ज नोंदणी करण्याच्या तारखा, निकालाच्या तारखा पॉडकास्ट करून जाहीर करण्यात आल्या होत्या, यामुळे विद्यार्थी आणि पालकात संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. अजून सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. यामुळे डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलला एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. व सदरचा व्हिडीओ यूट्यूबवरून तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर याचे स्पष्टीकरण प्रसारित करण्यात यावे व याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश या कायदेशीर नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

Web Title: Cet task force action against fake information leak to students at social media platform tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Career News
  • CET
  • CET Exam
  • Social Media

संबंधित बातम्या

RMS CET 2026: राष्ट्रीय मिलिट्री स्कूल प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!
1

RMS CET 2026: राष्ट्रीय मिलिट्री स्कूल प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!

Iraq News : इराक मधील महिलांचे नवीन शस्त्र मोबाईल ; लैंगिक छळाविरुद्ध कॅमेऱ्याचा वापर
2

Iraq News : इराक मधील महिलांचे नवीन शस्त्र मोबाईल ; लैंगिक छळाविरुद्ध कॅमेऱ्याचा वापर

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
3

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
4

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.