Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anganwadi System : 15,000 नंद घरांचा टप्पा पार; वेदांताच्या उपक्रमाचा 18 राज्यांमध्ये विस्तार

'नंद घर' उपक्रमाने 15 हजार केंद्रांचा टप्पा गाठत ग्रामीण भारतातील बालक आणि महिलांच्या विकासासाठी महत्त्वाची झेप घेतली आहे. पोषण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून हा उपक्रम देशभरात विस्तारत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 05:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अंगणवाडी व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे.
  • भारत घडवण्याचा संकल्प या उपक्रमातून अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • ‘नंद घर’ उपक्रम अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
अनिल अग्रवाल फाऊंडेशन अंतर्गत वेदांताच्या ‘नंद घर’ या सामाजिक उपक्रमाने देशभरात 15,000 केंद्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ‘विकसित भारत 2047’च्या उद्दिष्टाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचा विस्तार आता 18 राज्ये आणि 76 जिल्ह्यांपर्यंत झाला असून, त्याचा लाभ 5 लाखांहून अधिक बालके आणि 4 लाखांहून अधिक महिलांना मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या 75 नंद घर कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये 10,000 केंद्रांचा टप्पा गाठल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत आणखी 5,000 केंद्रे सुरू करण्यात आली. गेल्या वर्षभरात आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार या राज्यांमध्येही या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अंगणवाडी व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे.

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

या यशाबद्दल बोलताना नंद घरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी अरोरा यांनी सांगितले की, भारताच्या भविष्यातील प्रगती ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे. प्रत्येक नवीन नंद घर हे दर्जेदार पोषण, शिक्षण आणि आरोग्य सेवा मुलांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार, स्थानिक प्रशासन आणि समाजाच्या सहकार्याने अधिक सक्षम भारत घडवण्याचा संकल्प या उपक्रमातून अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक नंद घर हे आधुनिक आणि तंत्रज्ञान-सज्ज अंगणवाडी केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे बालशिक्षण, पोषण, प्राथमिक आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘सक्षम अंगणवाडी’ आणि ‘पोषण 2.0’ अभियानाशी सुसंगत असून, बालविकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना देतो.

PF की म्युच्युअल फंड? निवृत्तीच्या पैशांसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? EPFO ने केला खुलासा

उत्तर प्रदेशातील खोजवा येथील अंगणवाडी सेविका अंजू दुबे यांच्या कार्यातून या उपक्रमाचा प्रभाव दिसून येतो. संवादात्मक शिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समुदायाच्या सहभागातून त्यांनी केंद्राचे प्रभावी शिक्षण केंद्रात रूपांतर केले. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून पालकांचाही सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या 15,000 केंद्रे कार्यरत झाल्यानंतर ग्रामीण भारतातील अधिकाधिक महिला आणि बालकांपर्यंत पोषण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि उपजीविकेच्या संधी पोहोचवण्याचा वेदांताचा ‘नंद घर’ उपक्रम अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Expansion of vedantas initiative across 18 states of anganwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • education
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा
1

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
2

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
4

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.