Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Chicken Biryani in Schools: बिर्याणी ही अत्यंत लोकप्रिय डिश आहे. एका सर्वेनुसार बिर्याणी ही भारतीय हॉटेल्समध्ये सर्वाधिक खाल्ली जाणारी डिश आहे. हीच बिर्याणी आता सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी एका राज्यातील मुख्यमंत्री नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 06:07 PM
सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? स्वच्छता-अन्नसुरक्षेची आधी चाचणी, मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत (फोटो सौजन्य-ChatGPT)

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? स्वच्छता-अन्नसुरक्षेची आधी चाचणी, मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • शालेय पोषण आहारात चिकन बिर्याणीचा विचार
  • मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारची नवी योजना
  • स्वच्छता-अन्नसुरक्षेची आधी चाचणी
Chicken Biryani in Schools: बिर्याणी हा खवय्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे चिकन लव्हर्सना बिर्याणी खाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. अशातच आता सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात चिकन बिर्याणीचा समावेश होणार आहे. हा प्रस्ताव कोणत्या राज्यात आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी…

तामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात चिकन बिर्याणीचा समावेश करण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, त्याची थेट राज्यभर अंमलबजावणी न करता सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा विचार आहे.

Singapore Reading Campaign: रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, जाणून घ्या

आधी पायलट प्रोजेक्ट

शालेय शिक्षणमंत्री ए. राजमोहन यांनी या प्रस्तावाबाबत माहिती देताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी चिकन बिर्याणी तयार करणे, ती सुरक्षित पद्धतीने शाळांपर्यंत पोहोचवणे आणि अन्नाची गुणवत्ता कायम राखणे यासाठी आवश्यक व्यवस्थेची पायलट प्रोजेक्टमध्ये चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच व्यापक अंमलबजावणीबाबत निर्णय होईल.

‘कैद्यांना मिळते, मग विद्यार्थ्यांना का नाही?’

राजमोहन यांनी या योजनेचे समर्थन करताना पुझल कारागृहातील कैद्यांना चिकन बिर्याणी दिली जाते, मग विद्यार्थ्यांना ती का मिळू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचीही विद्यार्थ्यांना असा पर्याय उपलब्ध करून देण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

जुलैपासून प्रस्तावाची चर्चा

हा प्रस्ताव नवीन नाही. जुलै 2026 मध्येच सरकारी शाळांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणीचा समावेश करण्याचा प्रस्ताव समोर आला होता. त्यावेळी राजमोहन यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले होते.

मुलांच्या प्रोटीनच्या गरजेवर भर

शालेय शिक्षणमंत्र्यांनी वाढत्या वयातील मुलांना पुरेशा प्रमाणात प्रोटीनची गरज असल्याचा मुद्दा मांडला आहे. तामिळनाडूमधील शालेय पोषण कार्यक्रमात काळानुसार बदल करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर मांसाहारी पर्यायाचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शाकाहारी विद्यार्थ्यांचे काय?

प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झाल्यास चिकन बिर्याणी सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीची नसेल. शाकाहारी आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शाकाहारी जेवणाचा पर्याय उपलब्ध राहील, तर मांसाहारी आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चिकन बिर्याणीचा पर्याय दिला जाऊ शकतो.

FLNAT Exam Postponed: ‘उल्लास नव भारत साक्षरता’ योजनेची FLNAT परीक्षा पुढे ढकलली; शिक्षण विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश

Web Title: Tamil nadu government plans chicken biryani for government school students pilot project cm vijay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • education
  • School
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.