Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकर करा! तातडीने भरती करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथे २०१३ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्याने महाविद्यालयांमध्ये मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. डॉ. गजानन सानप यांनी प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याचा इशारा देत तातडीने भरती करण्याची मागणी केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 06:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन स्तरावर २०१३ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गजानन सानप यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत.

RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

मराठवाडा अस्थायी शिक्षकेतर मंचच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरस्वती भुवन संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, सिनेट सदस्य डॉ. सुधाकर चव्हाण तसेच आनंद वाघ यांची उपस्थिती होती. बैठकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

डॉ. सानप यांनी नमूद केले की, गेल्या जवळपास १३ वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीस शासनाने मंजुरी दिलेली नाही. यामुळे अनुदानित महाविद्यालयांमधील प्रशासकीय यंत्रणा कमकुवत होत चालली आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाने प्राध्यापक भरतीस दुसऱ्यांदा मान्यता दिली असली, तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या पदांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढून भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याशिवाय, अनेक वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अस्थायी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदभरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणीही पुढे आली. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष शिथिलता देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा योग्य उपयोग होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या मागण्यांमुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी शिक्षण संस्था प्रतिनिधी म्हणून डॉ. श्रीरंग देशपांडे आणि प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून डॉ. गजानन सानप यांनी पुढाकार घ्यावा, असा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीस मराठवाडा विभागातील मोठ्या संख्येने अस्थायी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Buldhana : भित्तीपत्रक स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार! व्यंकटेश कॉलेजचा पुढाकार; मान्यवरांनी व्यक्त केले विचार

एकंदरीत, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर महाविद्यालयीन प्रशासनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Expedite the recruitment of non teaching staff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
1

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
2

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
3

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी
4

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.