Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Growth Tips: पुण्यातील रोहित यादवच्या व्हायरल पोस्टने कॉर्पोरेट विश्वात उडाली खळबळ; नेमका काय आहे वाद? जाणून घ्या

Corporate Career Growth Tips: कॉर्पोरेट जगात स्वतःचे स्थान कसे निर्माण करावे? पुण्याच्या एका प्रॉडक्ट मॅनेजरने शेअर केलेल्या ४ साध्या पण प्रभावी सवयी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 11, 2026 | 01:43 PM
it

it

Follow Us
Follow Us:

Corporate Career Growth Tips:  कॉर्पोरेट विश्वात एक जुनी म्हण आहे – फक्त चांगले काम करणे पुरेसे नाही, तर आपले काम योग्य पद्धतीने मांडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्यात एका टेक कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या रोहित यादवने याच विषयावर आपले वैयक्तिक अनुभव शेअर केले, ज्यामुळे इंटरनेटवर एका नव्या वादाला तोंड फुटले. रोहितची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे नोकरदार वर्गात दोन तट पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया नेमका काय विषय आहे?

रोहित यादवच्या ‘या’ ४ सवयींनी बदलला गेम

रोहित यादवने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की, या सवयी खूप गाजावाजा करणाऱ्या किंवा हाय-फाय नव्हत्या. पण, त्यांनी हळूहळू लोकांच्या मनात त्याची प्रतिमा बदलली. त्याने ६ महिने या सवयींचे पालन केले:

१. वीकली विन्स: रोहित प्रत्येक शुक्रवारी त्या आठवड्यात मिळवलेल्या ३ छोट्या किंवा मोठ्या यशाबद्दल लिहून ठेवायचा. यामुळे त्याला स्वतःच्या कामाबद्दल स्पष्टता मिळाली आणि परफॉर्मन्स रिव्ह्यू दरम्यान तो पूर्ण आत्मविश्वासाने बोलू शकला.

२. मंथली मॅनेजर अपडेट्स: महिन्यातून एकदा तो आपल्या मॅनेजरला अतिशय छोटा आणि थेट (टू-द-पॉइंट) मेसेज पाठवायचा. यामध्ये आपण काय काम केले, त्याचे काय परिणाम झाले आणि काय नवीन शिकलो हे तो सांगायचा. कोणतीही फालतू बडबड न करता, केवळ निकालावर (Outcome) चर्चा. यामुळे कोणतीही बढाई न मारता तो बॉँसच्या नजरेत राहिला.

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

३. योग्य प्रश्न विचारणे: ‘वन-टू-वन’ (1:1) मीटिंगमध्ये रोहितने आपल्या मॅनेजरला थेट विचारले – मला पुढील लेव्हलसाठी स्वतःला तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे? या एकाच प्रश्नाने फीडबॅकचे मार्ग मोकळे केले.

४. मीटिंगमध्ये आवाज उठवणे: रोहित यादवने ठरवले की तो मीटिंग्समध्ये केवळ मूक प्रेक्षक बनणार नाही. भलेही फक्त १० सेकंदांचे इनपुट द्यायचे असेल, पण तो आपले म्हणणे नेहमी मांडायचा. त्याचे असे मानणे आहे की, चुपचाप काम करणाऱ्यांना लोक सहसा विसरून जातात.

सोशल मीडिया युजर्सची प्रतिक्रिया काय?

रोहित यादवची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला. एका बाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, आजच्या कॉर्पोरेट जगात टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी हे ‘स्मार्ट वर्क’ अत्यंत आवश्यक आहे. मॅनेजर्सकडे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे स्वतःचे स्थान निर्माण करणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे, असे त्यांचे मानणे आहे.

Government Jobs 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार पदांची मोठी भरती; १० वी पास असणाऱ्यांना उत्तम संधी!

दुसरीकडे, समीक्षकांचा तर्क आहे की, हे सर्व कामापेक्षा जास्त ‘सेल्फ-प्रमोशन’ आणि निव्वळ दिखावा आहे. काही युजर्सनी कमेंट केली की, जर एखाद्या कंपनीत फक्त १० सेकंद बोलल्याने किंवा दरमहा मेसेज पाठवल्याने प्रमोशन मिळत असेल, तर तिथे कामाच्या दर्जाला काहीच किंमत नाही. काही लोकांनी याला वर्कप्लेसवर विनाकारण ताण वाढवणारी सवय म्हटले आहे.

‘प्लॅन बी’ तयार ठेवा

रोहित यादवने आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की, यश हे केवळ एखाद्या परीक्षेवरून किंवा प्रमोशनवरून ठरत नाही, तर तुम्ही दररोज प्रामाणिकपणे आव्हानांचा सामना कसा करता यावर ते अवलंबून असते. त्याने नोकरीची तयारी करणाऱ्यांना आणि प्रोफेशनल्सना नेहमी एक ‘प्लॅन-बी’ (Plan-B) तयार ठेवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे मानसिक ताण कमी करता येऊ शकेल. रोहितचा हा फॉर्म्युला कदाचित प्रत्येकासाठीच योग्य ठरणार नाही, पण याने कॉर्पोरेट वर्क कल्चरचे एक मोठे सत्य नक्कीच समोर आणले आहे.

Web Title: Pune product manager rohit yadav corporate career growth tips viral post promotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Career News
  • High salary Job
  • Private Company

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
2

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
4

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.