Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Result 2026: बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर; यंदा निकालात ४.९३ टक्के घट

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर १५ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 04:38 PM
HSC Result 2026: बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर; यंदा निकालात ४.९३ टक्के घट
Follow Us
Follow Us:
  • बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
  • यंदा निकालात ४.९३ टक्के घट
  • राज्याचा निकाल ३८.७२ टक्के
सोनाजी गाढवे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेचा (HSC) निकाल मंगळवार (दि. १४ जुलै) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला. यंदा राज्यभरातून परीक्षेसाठी १,०३,६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे राज्याचा (Career) एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाचा तपशील जाहीर केला.

या वर्षी कला शाखेचे ३१ हजार ९६०, विज्ञान शाखेचे ४१ हजार ५४१, वाणिज्य शाखेचे २७ हजार ६९५, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) २ हजार १४०, आयटीआयच्या ३०६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. १ लाख २ हजार ५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा २६ हजार ४ (६४.९५ टक्के), कला शाखेचे ६ हजार ८३४ (२१.४० टक्के), वाणिज्य शाखेचे ६ हजार १९५ (२२.४० टक्के), एमसीव्हीसीचे ३९२ (१८.३४ टक्के), आयटीआयचे ९३ (३४.४९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ४३.६५ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात ४.९३ टक्के घट झाली आहे.

गुणपडताळणी व उत्तरपत्रिका
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर १५ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी शुल्क: प्रति विषय ५० रुपये उत्तरपत्रिकेची छायाप्रत: प्रति विषय ४०० रुपये पुनर्मूल्यांकन शुल्क: प्रति विषय ३०० रुपये (छायाप्रत घेणे अनिवार्य) अशी आहे.

10th Supplementary Result 2026: इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! मुलींची बाजी, नागपूर विभाग राज्यात अव्वल

बारावी पुरवणी परिक्षा निकाल

तपशील – मुले – मुली – एकूण
नोंदणी झालेले – ६८,७४३ – ३४,८९९ – १,०३६४२
प्रविष्ट झालेले – ६७,७६७ – ३४,२८३ – १,०२०५०
उतिर्ण – २४,४७२ – १५,०४६ – ४०,५१८
उतिर्ण टक्केवारी – ३६.११ – ४३.८८ – ३८.७२

विभागीय मंडळनिहाय निकाल

विभागीय मंडळ – नोंदणी झालेले – प्रविष्ट झालेले – उतिर्ण – टक्केवारी
पुणे – १८,९८३ – १८,६७८ – ६,९०६ – ३६. ९७
नागपूर – १०,८३२ – १०,६८६ – ३९१३ ३६.६१
छ. संभाजीनगर – ११,५८५ – ११४१२ – ६०३८ – ५२.९०
मुंबई – ३०,३३६ – २९,७२४ – ९,८७५ – ३३.२२
कोल्हापूर – ८,१५७ – ८,०७३ – २,८४४ – ३५.२२
अमरावती – ५,२७३ – ५१८५ – १९५५ – ३७. ७०
नाशिक – ७,७७५ – ७७४९ – ३,२५६ – ४२.०१
लातूर – १०००१ – ९८५९ – ४५८८ – ४६. ५३
कोकण – ७०० – ६८४ – १४३ २०. ९०
एकूण – १,०३६४२ – १०२०५० – ३९५१८ – ३८.७२

Career Options After 10th: १० वी नंतर ‘हे’ ६ डिप्लोमा कोर्सेस निवडा; करिअरमध्ये मिळेल झटपट यश

निकालात घट

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्णतेची तुलना

वर्ष – टक्केवारी
जुलै- ऑगस्ट – २०२४ – ३२.४६
जुन – जुलै – २०२५ – ४३.६५
जुन – जुलै – २०२६ – ३८.७२

Web Title: Class 12 supplementary exam results declared 4 93 drop in results this year hsc career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Career News
  • HSC result
  • Students

संबंधित बातम्या

भारतातील संगीत क्षेत्रात करिअरचे सुवर्णयुग; ‘या’ प्रसिद्ध संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळाली ₹४५ हजारांपेक्षा अधिकची नोकरी
1

भारतातील संगीत क्षेत्रात करिअरचे सुवर्णयुग; ‘या’ प्रसिद्ध संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळाली ₹४५ हजारांपेक्षा अधिकची नोकरी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा
2

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा

Career Growth Tips: पुण्यातील रोहित यादवच्या व्हायरल पोस्टने कॉर्पोरेट विश्वात उडाली खळबळ; नेमका काय आहे वाद? जाणून घ्या
3

Career Growth Tips: पुण्यातील रोहित यादवच्या व्हायरल पोस्टने कॉर्पोरेट विश्वात उडाली खळबळ; नेमका काय आहे वाद? जाणून घ्या

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे
4

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.