Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेतून नेत्र तपासणी! विद्यार्थ्यांना मोफत उच्च-गुणवत्तेचे चष्मे वाटप

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेतून १९ जिल्ह्यांतील १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण, तर ४२,७६२ विद्यार्थ्यांना मोफत उच्च-गुणवत्तेचे चष्मे वाटप.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 21, 2025 | 05:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अंधत्वमुक्त महाराष्ट्र घडवणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार झाला. या उपक्रमांतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांतील १,८०० शाळांमधील तब्बल ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्यामुळे शासनाने जगातील अग्रगण्य चष्मा उत्पादन करणाऱ्या एसीलर लक्सोटिका कंपनीसोबत भागीदारी केली. या भागीदारीनुसार महाराष्ट्रातील २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून, दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४२,७६२ विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे चष्मे वाटण्यात आले आहेत.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांनाही नेत्र तपासणीची सुविधा मिळत आहे. ‘दृष्टी यज्ञ युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम’ या नावाने सुरू झालेल्या या मोहिमेतून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण अडथळ्याशिवाय पुढे जावे, हे सुनिश्चित केले जात आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, अकोला, धुळे, जालना, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश झाला आहे. मोबाईल तपासणी युनिट्स, प्रशिक्षित नेत्रतज्ञांची पथके आणि जागतिक दर्जाच्या लेन्स यांच्या साहाय्याने या मोहिमेने शालेय जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

पूर्वी फळा नीट न दिसल्यामुळे अभ्यासात अडथळा येणारे विद्यार्थी आता स्पष्ट दृष्टीमुळे ताण न घेता वाचन करू शकतात, वर्गात लक्षपूर्वक शिकतात आणि आत्मविश्वासाने सहभाग घेतात. हा उपक्रम केवळ नेत्र आरोग्यापुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. शिक्षण आणि प्रगतीच्या मार्गावर दृष्टीदोष हा अडसर ठरू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. “स्वच्छ दृष्टी हीच उज्ज्वल भविष्यातील गुरुकिल्ली आहे. या उपक्रमातून आपण हजारो मुलांचे जीवन बदलत आहोत. चांगले शिक्षण, उच्च ध्येये आणि उज्ज्वल भवितव्य याचे दरवाजे आपण त्यांच्यासाठी उघडतो आहोत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Eye screening through the blindness free maharashtra campaign in schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली
1

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
2

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास
3

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल
4

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.