Success Story of Renu Raj
युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच UPSC! देशभरात अनेक तरुण असे आहेत जे दिवस रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले आहेत, त्यातील काही या परीक्षेला अपात्र करत पुन्हा त्या परीक्षेला पात्र करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर काहीजण अशी आहेत जे अगदी पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेला पात्र करतात. त्यातलीच एक हुशार अशी उमेदवार जी आता स्वतः आयएएस ऑफिसर आहे ती म्हणजे केरळाची रेणू राज!
राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू
एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली रेणू दिवस-रात्र कष्ट करत यूपीएससी परीक्षेत पात्र ठरली आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे रेणूने त्यासाठी डॉक्टरीही सोडून दिली. एकाग्रतेने स्पर्धा परीक्षेची तयारी करत तिने अगदी पहिल्याच प्रयत्नात दुसऱ्या रँकने परीक्षेला पात्र केले. रेणू मूळची केरळची! तिचे वडील बस कंडक्टर होते तर आई गृहिणी होती. घरची आर्थिक परिस्थिती फार काही उत्तम नव्हती. तरी तिच्या पालकांनी तिच्या शिक्षणात कसलीही कमतरता येऊ दिली नाही. रेणूचे सुरुवातीचे शिक्षण सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. नंतर तिने एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसची डिग्री घेतली. त्यानंतर ती ASI हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून नोकरी करत होती.
पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवतानाच रेणू राजने आपल्या आयुष्याचा आणखी एक मोठा ध्यास ठेवल्याचं दिसून येतं. डॉक्टर म्हणून कार्यरत असताना तिने समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगली. रुग्णांची सेवा करताना तिला जाणवले की, आरोग्यसेवेबरोबरच समाजाच्या इतरही अनेक समस्या आहेत ज्यावर काम करणं गरजेचं आहे. याच विचारातून तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
2014 मध्ये तिने कठोर मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पात्र केली. सर्जन असल्यामुळे आधीच ती फार व्यस्त होती. ती दररोज 6 ते 8 तास अभ्यासासाठी वेगळा वेळ काढत असे. अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास आणि कधीही हार न मानणारी वृत्ती यामुळेच तिच्या कष्टांना यश मिळालं. आज रेणू राज आयएएस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि प्रशासकीय जबाबदारी या दोन्हींचा संगम तिच्या कामात दिसून येतो. तिच्या यशोगाथेने देशभरातील हजारो तरुणांना प्रेरणा दिली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरली आहे. तिचा प्रवास हेच दाखवून देतो की, जर ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले तर कोणताही मार्ग अवघड राहत नाही.