
Graduation Program in Mumbai University aligned colleges, Mumbai University, Admission in Mumbai University, Carrie, Education,
विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये बीकॉम १७६६९०, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) ६४१७४, बीकॉम (अकाऊंट एँड फायनान्स) १२७०४६, बीए ५११३३, बीएस्सी आयटी ८७६४१, बीएस्सी ४३२३१, बीएस्सी कम्प्युटर सायन्स ६८३२२, बीएएमएमसी ४२२५२, बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंस) २०९६०, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) ३३८४७, बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी) ४४९५४, बीएस्सी (डेटा सायन्स) १६९१६, बीएस्सी एआय ११३९७, बीएस्सी डेटा सायन्स अँड एआय ८२५८, बीएस्सी (एआय अँड मशिन लर्निंग) १४१४७, सायबर सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक यासह विविध अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमीत केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.