मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू (Photo Credit- X)
पाली विभागामार्फत पीएच.डी., एम.ए. (पाली), एम.ए. (पाली व बौद्ध अध्ययन) तसेच बी.ए.-एम.ए. पाच वर्षीय एकात्मिक पाली अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय विपश्यना भावना, परियत्ती व पटिपत्ती पाली साहित्य, पाली व भारतातील बौद्ध अध्ययन, पाली भाषा व बौद्ध कला तसेच भारतातील बौद्ध तीर्थस्थळे आणि पर्यटन या विषयांतील एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत.
तसेच पाली भाषा व साहित्य, पाली भाषा व बुद्धांचे उपदेश आणि पाली व भारताची बौद्ध संस्कृती या विषयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, काही अभ्यासक्रम पीएम-उषा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले असून ठाणे उपपरिसर, स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड अप्लाईड सायन्सेस कल्याण येथे सुरु करण्यात आले आहेत. प्रामुख्याने या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य विकास व क्षमता वृद्धीवर भर देण्यात आला आहे. भारतीय ज्ञान प्रणाली संकल्पनेशी जोडलेले ई-अध्ययन साहित्य विकसित करण्याचाही उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
पाली विभागातील अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना बौद्ध विचारसरणी, संशोधन, सांस्कृतिक अध्ययन, पर्यटन आणि सामाजिक मूल्यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार असून शैक्षणिक व करिअरच्या विविध वाटा खुल्या होणार आहेत. प्रवेशास इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाशी संपर्क साधावा किंवा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१. संशोधन व पदव्युत्तर अभ्यासक्रम
२. एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम
३. एक वर्षीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम






