फोटो सौजन्य- सोशल मीडिया
JEE Advanced Answer Key 2026 OUT: भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुड़की (IIT Roorkee) द्वारे जेईई (JEE) ॲडव्हान्स्डची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. २५ मे, सोमवार सकाळी १०: ०० वाजता जेईई ॲडव्हान्स्डची ‘आन्सर की’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उमेद्वार jeeadv.ac.in या संकेतस्थळावरून जेईई ॲडव्हान्स्डची तात्पुरती उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
एवढेच नव्हे, तर जर उमेद्वारांना जाहीर केलेल्या उत्तरांबाबत काही आक्षेप असतील तर ते उत्तरतालिका पाहिल्यानंतर आपले आक्षेप नोंदवू शकतात.
1) उमेद्वाराने सर्वात प्रथम जेईईच्या अधिकृत संकेतस्थळाला jeeadv.ac.in भेट द्यावी.
2) त्यानंतर होमपेजवर ‘Provisional Answer Key 2026’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.
3) लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन तपशील भरावेत.
4) उमेद्वाराने सर्व तपशील देऊन सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर उत्तरतालिका दिसेल.
5) येथून तुम्ही जेईई ॲडव्हान्स्ड तात्पुरती उत्तरतालिका २०२६ ची पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात.
6) याशिवाय भविष्यातील संदर्भासाठी जेईई ॲडव्हान्स्डच्या तात्पुरत्या उत्तरतालिकेची प्रिंट काढून देखील ठेऊ शकता.
CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?
जेईईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, जेईई ॲडव्हान्स्ड तात्पुरत्या उत्तरतालिकावरील आक्षेप आणि प्रतिक्रिया २५ मे २०२६ सकाळी १०:०० वाजल्यापासून ते २६ मे २०२६ संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत सबमिट केल्या जाऊ शकतात. आपले आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर जावे, तेथे आपल्या हरकती नोंदवाव्यात. उमेद्वारांनी ईमेल किंवा इतर कोणत्याताही माध्यमातून पाठवलेले आक्षेप स्विकारले जाणार नाहीत.
जेईई प्रशासनाकडून पेपर १ आणि पेपर २ या दोन्ही पेपर्सची तात्पुरती उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात जेईईची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) प्रसिद्ध होईल. त्यामुळे उमेद्वारांनी अधिक माहितीसाठी किंवा नवीन अपडेटसाठी जेईईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावे.






