Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश

Maharashtra Medical Admission: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या विशेष फेरीची यादी जाहीर केली असून,निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 03:34 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने चौथी यादी जाहीर केली
  • चौथ्या यादीत १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
  • विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे
Maharashtra Medical Admission: राज्यातील आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या विशेष फेरीत १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. आयुर्वेद १,२७७, होमिओपॅथी ६७० आणि युनानी ३२ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने चौथी यादी जाहीर केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी आयुर्वेद बीएएमएस, होमिओपॅथी बीएचएमएस आणि युनानी बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या फेरीनंतर बुलढाणा येथील नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला प्राधिकरणाकडून प्रथमच परवानगी मिळाली. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याची परवानगी नसल्याने उच्च गुणवत्ता प्राप्त उमेदवारांना नवीन शासकीय महाविद्यालयात संधी मिळणार नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने प्रवेशासाठी विशेष चौथी कॅप फेरी आयोजित केली होती.

चौथ्या यादीत १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

या चौथ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमांच्या राज्यातील २०८ आयुष महाविद्यालयांतील १४,२०५ जागांपैकी तिसऱ्या फेरीपर्यंत ११,५९१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या विशेष यादीत १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. आता ६३५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. स्ट्रे राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

बीएएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील १४१ महाविद्यालयांतील ९,५७९ जागांपैकी ८,१५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत १,२७७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १५१ जागा रिक्त आहेत. यापैकी २४ शासकीय महाविद्यालयांत २२२ आणि ११७ खासगी महाविद्यालयांत १,०५५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील ५९ महाविद्यालयांतील ४,१९६ जागांपैकी ३,०४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ६७० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८४ जागा रिक्त आहेत. यापैकी २ शासकीय महाविद्यालयांत ३० आणि ५७ खासगी महाविद्यालयांत ६४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

IIT Kharagpur Medical Course: मोठी बातमी! इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण ‘या’ संस्थानात मिळणार

बीयुएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील ८ महाविद्यालयांतील ४३० जागांपैकी ३९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ३२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये एकही जागा रिक्त नाही. यापैकी ३ शासकीय महाविद्यालयांत १ आणि ५ खासगी महाविद्यालयांत ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे

ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या विशेष यादीत एकूण किती विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे?

    Ans: या चौथ्या विशेष यादीत राज्यातील एकूण १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये आयुर्वेद (BAMS) १,२७७, होमिओपॅथी (BHMS) ६७० आणि युनानी (BUMS) ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • Que: चौथ्या फेरीनंतर आता किती जागा रिक्त आहेत आणि त्यांचे काय होणार?

    Ans: चौथ्या विशेष यादीनंतर तिन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण ६३५ जागा रिक्त आहेत (BAMS १५१ आणि BHMS ४८४ जागा). या सर्व रिक्त जागा पुढील स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील.

  • Que: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत काय आहे?

    Ans: चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्रे आणि शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.

Web Title: Maharashtra medical admission 4th special round list 1979 students sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Admission News
  • CET Exam
  • education

संबंधित बातम्या

AYUSH admission 2026: प्रवेशाची अंतिम संधी! आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या फेरीत ११,५९१ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश; ६३५ जागा रिक्त
1

AYUSH admission 2026: प्रवेशाची अंतिम संधी! आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या फेरीत ११,५९१ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश; ६३५ जागा रिक्त

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET
2

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव
3

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज
4

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.