Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

School Admission SOP: राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या मनमानी प्रवेश आणि शुल्क आकारणीला लगाम घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नवीन मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 04:40 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • खासगी शाळांच्या मनमानी प्रवेशाला लगाम
  • मुलाखती, चाचण्या आणि देणगी घेण्यास बंदी
  • पालकांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास कारवाई
  • शुल्क आकारणी साठी ‘एसओपी’ लागू, शिक्षण संचालकांचे निर्देश
सोनाजी गाढवे, नवराष्ट्र पुणे

School Admission SOP Maharashtra: राज्यातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शुल्क आकारणी आणि ‘आरटीई’ अंमलबजावणीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. प्रवेशासाठी मुलाखत, लेखी चाचणी, देणगी आणि अनावश्यक कागदपत्रके देणे यात अनिवार्य केले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी हे निर्देश दिले. शाळांमध्ये पहिलीपूर्वीच्या वर्गातील प्रवेशासाठी शासनाने ठरवलेल्या निकषांव्यतिरिक्त कागदपत्रांची मागणी, विद्यार्थी आणि पालकांच्या मुलाखती, लेखी किंवा तोंडी चाचण्या, देणगी किंवा अनधिकृत शुल्काची मागणी आणि भेदभावपूर्ण निवड होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कार्यपद्धती निश्चित केली आहे.

कोणत्याही पालकांकडून अनावश्यक कागदपत्रे मागता येणार नाहीत

प्रवेशावेळी कोणत्याही विद्यार्थ्याची किंवा पालकांची मुलाखत, लेखी किंवा तोंडी चाचणी अथवा अन्य स्क्रीनिंग प्रक्रिया राबवता येणार नाही. शासनाने ठरवलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागता येणार नाहीत. पालकांचे आयटीआर प्रमाणपत्र, सर्वाधिक उत्पन्नाचा दाखला, पालकांसोबत कुटुंबाचे छायाचित्र यांसारखी कागदपत्रे मागू नयेत, असे स्पष्ट केले आहे.

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी, कॅपिटेशन फी किंवा अन्य अनधिकृत शुल्क आकारता येणार नाही. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ, समान संधी देणारी व भेदभावविरहित असावी. जात, धर्म, भाषा, लिंग, सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती अथवा पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.

अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब करावा

मर्यादित जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास पारदर्शक लॉटरी पद्धतीचा अवलंब करावा. प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक शाळेच्या संकेतस्थळावर व शाळेत फलकावर प्रसिद्ध करावे. पालकांना नोंदणीसाठी किमान ७ कार्यालयीन दिवसांचा कालावधी द्यावा.

शुल्क आकारणी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ नुसार करावी. शुल्क संरचना सूचना फलकावर व संकेतस्थळावर दर्शवावी. प्रत्येक शुल्काची अधिकृत पावती पालकांना द्यावी. गणवेश, साहित्य, प्रवेश प्रक्रिया अथवा अन्य कारणास्तव नियमबाह्य किंवा सक्तीची आर्थिक आकारणी करू नये.

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश

विशिष्ट खासगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीची करता येणार नाहीत

विशिष्ट दुकानातून साहित्य, गणवेश व पाठ्यपुस्तकांची खरेदी सक्तीने करता येणार नाही. राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई शाळांनी एनसीईआरटी व एससीईआरटीच्या अभ्यासक्रमावरील पाठ्यपुस्तके वापरावीत. विशिष्ट खासगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीची करता येणार नाहीत. गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रवेश काळात अचानक तपासणी करावी. तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खासगी शाळांना प्रवेशावेळी कोणती कागदपत्रे किंवा प्रक्रिया राबवण्यास बंदी घातली आहे?

    Ans: पालकांचे आयटीआर (ITR) प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबाचे छायाचित्र यांसारखी अनावश्यक कागदपत्रे आणि कोणत्याही प्रकारची देणगी मागण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

  • Que: शाळेतील उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास प्रवेश कसे दिले जातील?

    Ans: मर्यादित जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास शाळांना पारदर्शक लॉटरी पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असेल. तसेच प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या वेबसाइटवर आणि सूचना फलकावर प्रसिद्ध करावे लागेल.

  • Que: पुस्तके आणि गणवेश खरेदीबाबत शाळांना कोणते निर्देश देण्यात आले आहेत?

    Ans: शाळांना विशिष्ट दुकानातून गणवेश, साहित्य किंवा विशिष्ट खासगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करता येणार नाही.

Web Title: Maharashtra private school admission sop no interview donation rules sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश
1

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET
2

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव
3

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज
4

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.