Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियमची घोषणा; तरुणांमध्ये तणाववाढ

नीरजा बिर्ला यांनी एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम सुरू करण्याची घोषणा केली, ज्याचा उद्देश मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक बदल घडवणे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2025 | 06:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मानसिक आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पद्धतशीर बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समिटमध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मेंटल हेल्थ फर्स्ट एड (एमएचएफए) ऑस्ट्रेलियाचे तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, धोरणकर्ते एकत्र आले. त्यांनी भारतातील तरुणांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यावर भर दिला.

मराठी साहित्यिक कवी ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म कधी झाला? जाणून घ्या त्यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती

नीरजा बिर्ला यांच्या हस्ते “अनवेलिंग द सायलंट स्ट्रगल: एमपॉवर रिसर्च रिपोर्ट” चे अनावरण करण्यात आले. या अहवालात महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्य समस्यांचा आढावा घेण्यात आला. संशोधनानुसार, 38% विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवतो, 50% च्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो, 41% सामाजिक अलगीकरण अनुभवतात, तर 47% झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असतात. तसेच, 8.7% विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दबावामुळे आत्महत्येचा विचार केला आहे, मात्र फक्त 2% व्यावसायिक मदत घेतात.

समिटमध्ये महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य सचिव निपुण विनायक, तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भाविस्कर उपस्थित होते. नीरजा बिर्ला म्हणाल्या, “भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मानसिक आरोग्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. एमपॉवरिंग माइंड्स समिट हे या परिवर्तनाची सुरुवात आहे.”

एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर भर देताना, हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉ. ब्लेझ् अग्युरे यांनी किशोरवयीन मानसिक आरोग्य संकटाच्या वाढत्या गांभीर्याबाबत भाष्य केले. तसेच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या डॉ. श्याम बिशेन यांनी मानसिक आरोग्य केवळ आरोग्यसेवेपुरते मर्यादित न ठेवता, ते सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक घटक असल्याचे स्पष्ट केले.

Gardening Tips: बटाट्याची सालं फेकण्याची करू नका चूक, बाजारातील खतापेक्षा ठरेल ऑर्गेनिक बटाट्याच्या सालीचे खत

या समिटच्या माध्यमातून मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक बदल घडविणे, लवकर हस्तक्षेप मॉडेल विकसित करणे आणि आंतर-क्षेत्रीय क्षमता बांधणी बळकट करण्यावर भर देण्यात आला. ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम या नव्या उपक्रमाद्वारे, भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्याला सार्वजनिक आरोग्य धोरणात प्राधान्य देण्यासाठी एक व्यापक मंच उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून मानसिक आरोग्याशी संबंधित धोरणे आकारली जातील आणि जागतिक स्तरावर तज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणले जाईल.

Web Title: Global mental health consortium announced at empowering minds summit 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
1

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
3

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
4

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.