फोटो सौजन्य- सौशल मीडिया
या भरती मोहिमेतून एकूण १८ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या दोन्ही संवर्गातील प्रत्येकी ९-९ पदांचा समावेश आहे.
प्राध्यापक पदे : शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोचिकित्साशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र आणि नेत्रशल्यचिकित्साशास्त्र ही नऊ पदे भरली जाणार आहेत.
सहयोगी प्राध्यापक पदे : शल्यचिकित्साशास्त्र, औषधशास्त्र, कान नाक घसाशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, दंतरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र आणि आपात्कालीन औषधवैद्यकशास्त्र पदेही भरली जाणार आहेत.
सेवानिवृत्त प्राध्यापक: सेवानिवृत्त अध्यापकांसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार मानधन दिले जाईल.
बिगर-सेवानिवृत्त उमेदवार: खाजगी किंवा अन्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्राध्यापक पदाकरिता दरमहा १,८५,००० रुपये तर सहयोगी प्राध्यापक पदाकरिता दरमहा १,७०,००० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.
उमेदवाराचे वय: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) नियमांनुसार शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत.
पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे: २३ नोव्हेंबर २०२६.
मुलाखत दिनांक: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.
पत्ता: इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सविस्तर माहितीसाठी gmcparbhani.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Ans: वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक (Professor) आणि सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या संवर्गातील विविध विभागांतील एकूण १८ रिक्त पदांची भरती केली जात आहे.
Ans: या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
Ans: कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.






