Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ IPO चा GMP केवळ ९६ रुपये; ‘लिस्ट होताच मिळणार प्रॉफिट?’ जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

३१ डिसेंबर रोजी खुला करण्यात आलेला 'हा' IPO आज बंद होणार आहे. तसेच ३ जानेवारी २०२४ रोजी अलॉट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लिस्ट होताच मिळणार प्रॉफिट? अनेक तज्ज्ञांनी मते नोंदवली आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 02, 2025 | 04:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा IPO ३१ डिसेंबर २०२४ रोजी खुला झाला आहे. तसेच२ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. एकंदरीत, आज डाव लावण्याचा शेवटचा दिवस आहे. हा IPO ₹२०४ ते ₹२१५ च्या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला आहे. ₹२६०.१५ कोटींच्या या पब्लिक इश्यूला पहिल्याच दोन दिवसांत गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. स्टॉक मार्केट निरीक्षकांच्या मते, इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ₹९६ च्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत, जो पहिल्या दिवशीच्या ₹८५ च्या प्रीमियमपेक्षा ₹११ ने जास्त आहे. ग्रे मार्केटमधील या सकारात्मकतेचे कारण म्हणजे उत्तम बाजार भावना आणि IPO च्या जोरदार सब्सक्रिप्शनचे आकडे.

इंडो फार्म इक्विपमेंट IPO सब्सक्रिप्शनविषयी जाणून घेऊयात. पुरवण्यात आलेलले आकडे, २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:३९ वाजेपर्यंतचे आकडे आहेत. एकंदरीत, एकूण सब्स्क्रिप्शन १११.२१ पटीने वाढले आहे. रिटेल गुंतवणूकदार ७३.१४ पटीने वाढले आहेत. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये (NII) ३०९.०० पटीने वाढ झाली आहे. क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्समध्ये (QIB) २९.५१ पट वाढ दिसण्यात आली आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 368 अंकांनी तर निफ्टी 98.10 अंकांनी वधारला

या IPO संबंधित अनेक तज्ञांनी आपली मते जाहीर केले आहेत. रिलायन्स सिक्युरिटीजने यावर आपले म्हणणे जाहीर केले आहेत. त्यांचे मत आहे की,“इंडो फार्मकडे मजबूत उत्पादन क्षमता, नवीन क्रेन विभागात विस्तार, आणि संशोधन व विकासासाठी उत्कृष्ट कौशल्य आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा IPO बहुगुणात्मक वाढीची संधी निर्माण करतो. आम्ही या इश्यूला ‘सब्सक्राइब’ करण्याची शिफारस करतो.” स्टॉक्सबॉक्स, बीपी इक्विटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीज, आणि वेंचुरा सिक्युरिटीज यांसारख्या तज्ज्ञ संस्थांनी देखील या IPO ला ‘सब्सक्राइब’ टॅग दिला आहे. ग्रे मार्केटमधील वाढता प्रीमियम आणि सब्सक्रिप्शनचे मजबूत आकडे लक्षात घेता, हा IPO गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.

या IPO संबंधित आनंद राठी यांचे मत आहे कि, “परंपरागत व्यवसाय मूल्य, अनुभवी प्रवर्तक, आणि उत्पादन क्षमतेचा विस्तार यामुळे इंडो फार्म दीर्घकालीन चांगल्या संभाव्यता दर्शवते. आम्ही याला ‘लांब कालावधीसाठी सब्सक्राइब’ करण्याचा सल्ला देतो.”

आयकरदात्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर; रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढली!

इंडो फार्म IPO संबंधित महत्त्वाची माहिती:

इंडो फार्म IPO आज २ जानेवारी २०२५ रोजी बंद होणार आहे. तसेच ३ जानेवारी २०२५ रोजी या IPO चे अलॉटमेंट होण्याची संभाव्यता आहे. तसेच ७ जानेवारी २०२४ रोजी या IPO ला लिस्टिंग केले जाईल. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड ही भारतातील शेती व बांधकामासाठी लागणारे उपकरणे जसे ट्रॅक्टर, क्रेन्स, आणि डिझेल इंजिन यांचे उत्पादन करणारी एक महत्वाची कंपनी आहे. हिमाचल प्रदेशस्थित कंपनी संशोधन, नवकल्पना, आणि गुणवत्तेला प्राधान्य देत ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. IPO ला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे कंपनीच्या भक्कम आर्थिक कामगिरीचा व भविष्यातील विकासाच्या शक्यतांचा प्रत्यय येतो.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Gmp of this ipo is only rs 96 will you get profit as soon as it is listed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Business News
  • share market news

संबंधित बातम्या

GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, महागाईचा धोका नाही, अर्थमंत्री काय म्हणाल्या? जाणून घ्या
1

GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, महागाईचा धोका नाही, अर्थमंत्री काय म्हणाल्या? जाणून घ्या

Sahara India Scam: सुब्रतो रॉय यांच्या पत्नी आणि मुलावर ईडीची कारवाई, मुलगा आणि पत्नी फरार घोषित
2

Sahara India Scam: सुब्रतो रॉय यांच्या पत्नी आणि मुलावर ईडीची कारवाई, मुलगा आणि पत्नी फरार घोषित

दिल्लीजवळील ‘या’ शहरात फक्त 8 लाख रुपयांमध्ये घर खरेदी करण्याची संधी! जाणून घ्या
3

दिल्लीजवळील ‘या’ शहरात फक्त 8 लाख रुपयांमध्ये घर खरेदी करण्याची संधी! जाणून घ्या

अन्न, वस्त्र, निवारा… घरातील प्रत्येक आवश्यक वस्तू झाली स्वस्त! जीएसटी दर कपातीवर अश्विनी वैष्णव काय म्हणाले? जाणून घ्या
4

अन्न, वस्त्र, निवारा… घरातील प्रत्येक आवश्यक वस्तू झाली स्वस्त! जीएसटी दर कपातीवर अश्विनी वैष्णव काय म्हणाले? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.