अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे 1 जानेवारी 2025 चे स्वागत भारतीय शेअर बाजाराने मोठ्या उत्साहाने केले आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 368.40 अंकांच्या वाढीसह 78,507.41 बंद झाला आहे. तर निफ्टी 98.10 अंकांनी वाढून, 23,742.90 अंकांवर पोहोचला आहे. ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
कोणते शेअर्स वधारले? कोणते घसरले?
सेन्सेक्स बुधवारी (ता.१) वाढीसह उघडला. मात्र, काही वेळातच घसरला. व्यवहाराच्या दुसऱ्या सहामाहीत बाजाराने नेत्रदीपक रिकव्हरी पाहिली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढले आणि 7 शेअर्स घसरले. यापैकी मारुती सुझुकीचे शेअर्स 3.26 टक्क्यांच्या वाढीसह 11221.20 रुपयांवर बंद झाले.
(फोटो सौजन्य – iStock)
महिंद्र अँड महिंद्रा, लार्सन अँड ट्रुबो, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्सही वधारले. तर टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, झोमॅटो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरले.
डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ
2024 मध्ये गुंतवणूकदारांना 8.4 टक्के परतावा
निफ्टी आणि सेन्सेक्सने 2024 मध्ये गुंतवणूकदारांना 8.4 टक्के परतावा दिला. मात्र, 2023 मधील 20 टक्क्यांच्या परताव्याच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल आणि गेल्या तिमाहीत सततची विदेशी विक्री यामुळे बाजारावर परिणाम झाला आहे. वर्ष 2024 मध्ये,सेन्सेक्स 5,898.75 अंकांनी किंवा 8.16 टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी 1,913.4 अंकांनी किंवा 8.80 टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्स या वर्षी 27 सप्टेंबर रोजी 85,978.25 च्या विक्रमी शिखरावर पोहोचला आणि त्याच दिवशी निफ्टीने 26,277.35 ची सर्वकालीन पातळी गाठली.
नवीन वर्षात बाजाराची वाटचाल कशी?
तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षातही अमेरिकेतील उच्च उत्पन्नासह परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यासारखे घटक कायम राहतील. या आठवड्यात प्रसिद्ध होणारा मासिक वाहन विक्री डेटा आणि प्री-क्वार्टर ट्रेड अपडेट हे भारतीय बाजारांसाठी महत्त्वाचे ठरतील कारण ते आगामी निकालांच्या हंगामात बाजाराची दिशा ठरवतील. असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)