Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Government Exam Rules : एसएससीच्या नवीन ॲडव्हायजरीनुसार, आता परीक्षा केंद्रावर उमेदवार स्वतः कॉम्प्युटर रीस्टार्ट किंवा शटडाउन करू शकणार नाहीत. नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 09, 2026 | 05:13 PM
ssc

ssc

Follow Us
Follow Us:

Government Exam Rules : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संगणक आधारित भरती परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी आणि परीक्षा केंद्रांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची ॲडव्हायजरी जारी केली आहे. आयोगाने परीक्षा केंद्रावरील कॉम्प्युटर सिस्टीमबाबत काही हालचालींवर बंदी घातली आहे. आता परीक्षेदरम्यान उमेदवार किंवा परीक्षा कर्मचारी स्वतःहून कॉम्प्युटर रीस्टार्ट, शटडाउन किंवा सिस्टीम बदलू शकणार नाहीत. या कामांसाठी अधिकृत परीक्षा स्टाफची परवानगी आणि ठरवून दिलेली प्रक्रिया पाळणे बंधनकारक असेल.

वास्तविक, आयोगाच्या मते मागील काही परीक्षांमध्ये असे प्रकार समोर आले होते, जेव्हा कोणतीही तांत्रिक अडचण नसताना उमेदवारांनी स्वतः किंवा परीक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉम्प्युटर सिस्टीम रीस्टार्ट करणे, बदलणे किंवा त्यात इतर प्रकारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आयोगाने अशा प्रकारच्या हालचालींमुळे परीक्षा आणि निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो, असे मानले आहे.

कॉम्प्युटर रीस्टार्ट किंवा बंद करण्यावर बंदी

नवीन ॲडव्हायजरीनुसार, परीक्षा केंद्रावर उमेदवार स्वतःहून कॉम्प्युटर सिस्टीम रीस्टार्ट किंवा शटडाउन करू शकणार नाहीत. याशिवाय कॉम्प्युटर किंवा मॉनिटर बदलण्यावरही प्रतिबंध असेल. जर अशा कोणत्याही प्रक्रियेची गरज भासली, तर ती केवळ अधिकृत परीक्षा कर्मचाऱ्यांमार्फत ठरवून दिलेल्या नियमांनुसारच केली जाऊ शकेल. उमेदवाराला सिस्टीममध्ये स्वतः कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची परवानगी असणार नाही.

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…

परीक्षेदरम्यान अडचण आल्यास काय करावे?

जर परीक्षा सुरू होण्यापूर्वी किंवा पेपरच्या दरम्यान कॉम्प्युटरमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवली, तर उमेदवाराने स्वतः सिस्टीम दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत तात्काळ सेंटर स्टाफ, इनविजिलेटर किंवा परीक्षा कर्मचाऱ्यांना समस्येबद्दल माहिती द्यावी लागेल. त्यानंतर परीक्षा केंद्राचा स्टाफ तांत्रिक समस्या तपासेल आणि आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करेल. तसेच या प्रक्रियेअंतर्गत प्रादेशिक कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर किंवा केंद्र कोऑर्डिनेटर यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.

नियम मोडल्यास होणार कारवाई

एसएससीने ॲडव्हायजरीमध्ये स्पष्ट केले आहे कि, जर एखादा उमेदवार किंवा परीक्षा कर्मचारी विनापरवानगी कॉम्प्युटर सिस्टीमसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करताना आढळल्यास, त्याच्याविरुद्ध संबंधित लिखित नियमांनुसार कारवाई केली जाईल. ही कारवाई विशेष परीक्षेच्या लागू नियमांच्या आणि संबंधित परीक्षा नोटीसमध्ये दिलेल्या तरतुदींच्या आधारे केली जाईल. आयोगाने उमेदवार आणि परीक्षा कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर सिस्टीम तसेच परीक्षेशी संबंधित उपकरणांमध्ये अनावश्यक छेडछाड टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

Walk-in Interview 2026: नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Web Title: Government exam rules ssc new advisory computer system rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Government Job
  • new rules
  • SSC
  • SSC Examination

संबंधित बातम्या

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर
1

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!
2

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला
3

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला

SSC Exam Tips: भरपूर अभ्यास करूनही निकाल येत नाहीये? ९०% विद्यार्थी ‘या’ ५ चुकांमुळे होतात नापास!
4

SSC Exam Tips: भरपूर अभ्यास करूनही निकाल येत नाहीये? ९०% विद्यार्थी ‘या’ ५ चुकांमुळे होतात नापास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.