
Image
एसएससी जेई २०२६ च्या पेपर १ चे प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या सुमारे २ ते ३ दिवस आधी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र आणि परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी आयोगाची वेबसाईट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
SSC JE पेपर १: २ ते ६ नोव्हेंबर २०२६
JE टेलिकॉम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग: ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६
टीप: टेलिकॉम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग परीक्षेसाठी परीक्षा शहराची माहिती परीक्षेच्या सुमारे ८ ते १० दिवस आधी जारी केली जाईल.
ज्या उमेदवारांना परीक्षेत स्क्राइब म्हणजेच लेखनिकाची मदत घ्यायची आहे, त्यांना आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी लागेल. आयोगाने स्क्राइब नोंदणी आधार प्रमाणीकरणाशी जोडली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना आपल्या स्क्राइबची नवीन नोंदणी करावी लागू शकते. स्क्राइबची नवीन नोंदणी पूर्ण करण्याची आणि त्याचा वन-टाईम रजिस्ट्रेशन (OTR) मॅप करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२६, रात्री ११ वाजेपर्यंत आहे. ठरवून दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांनाच स्क्राइबची सुविधा मिळेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आयोगाने JE (टेलिकॉम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग) साठी अर्ज करणाऱ्या आणि सायंटिफिक असिस्टंट (SA) पदासाठी पात्र उमेदवारांना विषयाचा पर्याय बदलण्याची अनुमती दिली आहे. ज्या उमेदवारांनी सायंटिफिक असिस्टंट हा डीफॉल्ट विषय निवडला होता, ते ‘इलेक्ट्रिकल अँड टेलिकॉम्युनिकेशन्स’ (EC/TC) हा डीफॉल्ट विषय म्हणून निवडू शकतात. तर कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (CS/IT) किंवा फिजिक्स विषय निवडण्यास उत्सुक उमेदवार परीक्षा शहर निवडण्याच्या पर्यायाद्वारे आपला विषय बदलू शकतात.
यासाठी अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२६, रात्री ११ वाजेपर्यंत आहे. यानंतर विषय बदलण्याची संधी मिळणार नाही. उमेदवारांना ॲडमिशन सर्टिफिकेटमध्ये नोंदवलेल्या विषयानुसारच परीक्षा द्यावी लागेल.
AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
१. सर्वात आधी SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जा.
२. होमपेजवर जाऊन ‘SSC JE Exam City Slip 2026 Download’ या लिंकवर क्लिक करा.
३. येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
४. यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर एक्झाम सिटी स्लिप दिसेल.
५. खाली दिलेल्या डाऊनलोडवर क्लिक करून ते तुमच्या स्क्रीन/डेस्कटॉपवर सेव्ह करा.
Ans: SSC JE पेपर १ ची परीक्षा २ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केली जाईल.
Ans: परीक्षा शहराची माहिती वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे, तर अधिकृत प्रवेशपत्र परीक्षेच्या २ ते ३ दिवस आधी डाऊनलोड करता येईल.
Ans: स्क्राइब नोंदणी आणि विषय बदलण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२६, रात्री ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.