Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन!

 वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ  त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्तूर/बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले.

  • By नारायण परब
Updated On: Oct 08, 2024 | 05:39 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ  त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्तूर/बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी केले. 187 कोटी रुपयांच्या निधीमधून पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभे राहणार आहे.

तसेच बहिरेवाडी येथे महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे त्यांनी कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमाला आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रामन घुंगराळेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, विद्यापीठ नाशिकचे प्र.कुलगुरू मिलिंद निकुंभ, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुरचे प्रशासकीय अधिकारी न.रा. पाटील, अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री महावीर खोत, डॉ.वीणा पाटील, डॉ.आदर्श देसाई यांच्यासह उत्तुर व बहिरेवाडीचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथे १५ एकर जागेत निसर्गरम्य ठिकाणी एक चांगले महाविद्यालय सुरू होत आहे. याचा फायदा स्थानिकांना वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. तसेच याच महाविद्यालयाच्या शेजारी १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे. शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर अंतर्गत येणारे कॉलेज बहिरेवाडी येथील जे.पी.नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पहिली तुकडी याचवर्षीपासून सुरू होत आहे. या इमारतीला १.५४ लक्ष रूपये दर महिना भाडेही शासनाकडून दिले जाणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हयात शेंडा पार्क, सांगाव, आणि ऊत्तुर येथील वेगवेगळ्या महाविद्यालय आणि रूग्णालयांच्या मंजूरी व सुविधांबाबतची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी उपस्थित संचालक आणि प्र. कुलगुरूंचे आभारही मानून मान्यता व प्रक्रिया जलदरीतीने राबविल्याबद्दल सत्कारही केला. संचालक डॉ.रामन यांनी आपल्या मनोगतामध्ये देशात योग व निसर्गोपचार केंद्र मागील ७० वर्षात ६ सुरू झाल्याचे सांगून मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ दीड वर्षात ५ नव्याने सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले. अगदी अल्प काळात मेडीकल हब तयार करण्याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते असे गौरवोद्गार त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल काढले. प्र.कुलगुरू निकुंभ यांनी योग आणि निसर्गोपचार काय आहे याबद्दल उपस्थितांना सांगितले. पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचा असून इंटर्नशिप एक वर्षाची असेल. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थी असतील अशारीतीने पुढिल चार वर्षात २४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर पुर्ण क्षमतेने कॉलेज सुरू राहील. या महाविद्यालयामुळे स्थानिकांना चांगल्या आरोग्यसेवाही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता भाग्यश्री महावीर खोत यांनी केले. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर सन्मान व सत्कार केला.

Web Title: Government yoga and naturopathic degree college and hospital building foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • kolhapur

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
1

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन
2

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
3

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
4

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.