Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर ! जाणून तुमची परीक्षा कधी सुरु होणार

मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेसंबंधी तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. विद्यापिठातील चारही विद्याशाखांच्या परीक्षांच्या तारखा विदयापिठाने जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या परीक्षांच्या तारखांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 04:12 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

मुंबई विद्यापीठाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेच्या तारखेची घोषणा विद्यापिठाकडून करण्यात आली आहे.  या सत्रातील  परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील  चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिवाळी अगोदर होणार असून काही परीक्षा या दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. जाणून घ्या परीक्षांच्या तारखांबद्दल

 

२३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार ‘या’ अभ्यासक्रमाची परीक्षा

हिवाळी सत्र २०२४ साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा या २३ ऑक्टोबर २०२४ पासून आयोजित केल्या जाणार आहेत.

हे देखील वाचा- मुंबई विद्यापिठाच्या CDOEच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

१३ नोव्हेंबर, १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार  ‘या’  अभ्यासक्रमाची परीक्षा

तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहेत. एलएलबी ( ३ वर्षीय) सत्र ५ आणि एलएलबी ( ५ वर्षीय) सत्र ९ ची परीक्षा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून आयोजित केल्या जातील. यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळविण्यात आले आहे.

हे देखील वाचा- पुण्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ! युवकांना परदेशात रोजगार संधी प्राप्त होणार

विद्यापीठाचे आवाहन 

विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही परिपत्रकानुसार नमूद केला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Graduation post graduation winter session exam dates announced by mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 04:12 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
1

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
2

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
3

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
4

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.