फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल बँक फॉर फायनान्शिअल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलोपमेंटने अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांना या भरतीच्या माध्यमातून अर्ज करून रोजगाराची संधी मिळवता येणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची मुभा ३० मार्च २०२५ तारखेपासून देण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदांमध्ये सिनिअर अनॅलिस्ट ऑफिसर पदासाठी असणाऱ्या रिक्त जागांचा समावेश आहे. नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला मुंबई, नवी दिल्ली तसेच भारतात इतर कोणत्याही शहरात नियुक्त करता येईल. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.nabfid.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप निश्चित नाही आहे. जनरल आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त शुल्कही आकारण्यात येतील. फक्त जनरल प्रवर्गातील उमेदवार नव्हे तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारानाही सारखीच रक्कम निश्चित करण्यात आली आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ही रक्कम १०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्कही आकारण्यात येतील.
सिनिअर अनॅलिस्ट ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी एकूण १७ जागा निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या शैक्षणिक अटीनुसार, CA / Post-Graduation in Economics, Finance, Banking, or Management शिक्षण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादे संबंधित निश्चित करण्यात आलेल्या अटीनुसार, किमान २१ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. काही आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना आयुमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. ते जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
भरती ३ टप्प्यात केली जाणार आहे. या टप्प्यांमध्ये प्रथमतः उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीचा समावेश आहे. तर अंतिम टप्प्यामध्ये उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणीसाठी यावे लागणार आहे. या सर्व नियुक्तीच्या टप्प्यांना पात्र उमेदवार या भरतीसाठी नियुक्त होण्यास पात्र आहे.