फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलात शामिल होण्यासाठी प्रयत्न करत आहात. मग आता तुमच्या प्रतिक्षेला पूर्णविराम लागला आहे. कारण या भरतीला लवकरच सुरुवात केले जाणार आहे. फक्त पुरुष नाही तर महिला उमेदवारदेखील या भरतीमध्ये अर्ज नोंदवू शकतात. इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट (INET 2025) साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
29 मार्च 2025 पासून उमेदवारांना त्यांचे अर्ज नोंदवता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे. INET स्टेज I परीक्षा मे 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अग्निवीर SSR तसेच अग्निवीर MR पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अग्निवीर SSR पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण केलेला असावा. तसेच अग्निवीर MR उमेदवार 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. नोंद घेण्याची बाब म्हणजे जे उमेदवार 10वी किंवा 12वी परीक्षा देत आहेत, तेही अर्ज करू शकतात. मात्र, निवड झाल्यास त्यांना मूळ गुणपत्रिका सादर करावी लागेल.
अधिसूचनेमध्ये नमूद वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार प्रत्येक बॅचसाठी ठरवलेल्या निकषांनुसार वयोमर्यादा निश्चित केली जाईल. ते जाणून घेण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या भरतीमध्ये फक्त अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. अग्निवीर पदासाठी भारतीय नौसेनेत 4 वर्षांची सेवा कालावधी असेल. उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य/OBC/EWS उमेदवार या भरतीसाठी एकूण ₹550 रुपये भरणार आहेत. तर हीच रक्कम SC/ST उमेदवारांसाठी ₹550 निश्चित करण्यात आली आहे.
शारीरिक पात्रता चाचणी अंतर्गत पुरुष उमेदवारांसाठी 1.6 किमी धावण्याचे अंतर 6 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 20 उठक बैठक, 15 पुशअप आणि 15 शिटअप करणे अनिवार्य आहे. महिला उमेदवारांसाठी 1.6 किमी धावण्याचे अंतर 8 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक असून त्यांना 15 उठक बैठक, 10 पुशअप आणि 10 शिटअप पूर्ण करावे लागतील. अधिक माहितीसाठी भारतीय नौसेनेची अधिकृत वेबसाइट तपासा.