फोटो सौैजन्य - Social Media
पायलट बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. पण बनतात कसे? याबद्दल साऱ्यांना ठाऊक नसते. जर तुम्हाला याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. जर तुमची १२ झाली असेल तर कायम लक्षात असू द्या की १२ मध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे विषय असणे आवश्यक असते. जर तुम्ही या विषयांसह उत्तीर्ण आहात तर तुमचा मार्ग मोकळा आहे. यांनतर Directorate General of Civil Aviation देणारे मान्यता प्राप्त असणाऱ्या एखाद्या कोणत्याही वैद्यकीय संस्थेतून वैद्यकीय चाचणी पात्र करणे आवश्यक असते. या चाचणीला पात्र उमेदवार पडूहील टप्प्यासाठी नियुक्त होतो.
वैद्यकीय चाचणी मध्ये यश मिळवल्यानंतर उमेदवाराला परवाना काढावा लागतो. त्यासाठी Directorate General of Civil Aviation द्वारे मान्यता प्राप्त असणाऱ्या ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रवेश घ्यावे. CPL ( Commercial Pilot License ) मिळवण्यासाठी फार खर्च येतो. त्यासाठी २ वर्षांचा कोर्स करावा लागतो, ज्यामध्ये बहुतेक ४५ लाखांपर्यंत खर्च जाऊ शकतो. पण जर तुम्ही विदेशी जाऊन अगदी कमी खर्चात CPL मिळवण्याचा निर्धार करत असाल तर अमेरिका, साउथ अफ्रिका, फिलिपिन्ससारखे देश अगदी स्वस्तात मस्त रित्या ट्रेनिंग देतात आणि परवाना मिळवून देतात.
परवाना मिळवून देण्यासाठी Directorate General of Civil Aviation एका परीक्षेचा आणि मुलाखतीचे आयोजन करते. परीक्षा लेखी असते, उमेदवारांना ते पात्र करावे लागतात. मुख्यतः उमेदवाराकडे कोणत्याही Airlines मध्ये अर्ज करण्यापूर्वी एक अट पात्र असणे अनिवार्य आहे, ती म्हणजे उमेदवाराकडे किमान 200 तासांची उड्डाण भरण्याचा अनुभव हवा. त्यांनतर त्याची नियुक्ती केली जाते. CPL मिळाला की कोणत्यातरी Airlines मध्ये Co-Pilot म्हणून नोकरी मिळू शकते. तसेच NDA सारख्या Air Force मध्ये अर्जही करता येतो. जर तुम्ही या क्षेत्रात मोठी उड्डाण भरू इच्छित तर काही सरकारी योजना उमेदवारांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत पुरवत आहेत, ज्याचा फायदा घेत तुम्ही उंच भरारी घेऊ शकता.