Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास…

जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 07:28 PM
HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची 'परीक्षा'; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास...

HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची 'परीक्षा'; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास...

Follow Us
Follow Us:

राज्यभरात उद्यापासून बारावीची परिक्षा
कॉपीमुक्त अभियानराबवत  कडक कारवाईचा इशारा
राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत

पुणे/सोनजी गाढवे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने आजपासून (१० फेब्रुवारी ते बुधवार दि. १८ मार्च) या कालावधीत राज्यातील बारावीची (HSC) परिक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी नोंदणीकृत झाले असून, राज्यभरातील ३ हजार ३८७ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.

डॉ. बेडसे म्हणाले, परीक्षार्थींनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात नैराश्य किंवा तणाव जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने समुपदेशन सुविधा उपलब्ध केली आहे. राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून विभागीय स्तरावरही जिल्हानिहाय समुपदेशक नेमले आहेत. तसेच नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा व्यापक वापर करण्यात येत आहे. ३३ हजाराहून अधिक मुख्याध्यापक/प्राचार्यांना ईमेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप बल्क मेसेज द्वारे सूचना पाठविण्यात आल्या आहेत. समाजातील मान्यवरांचे व्हिडिओ संदेशही प्रसारित केले जात आहेत.

CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू

१७२ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल

शिक्षण विभागाने परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही असणे अनिवार्य केले आहे. मात्र, राज्यातील १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नाही. त्यामुळे या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबद करण्यात आली आहे. राज्य मंडळाने २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती बेडसे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात गुगल मीट, झूमचा वापर

जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही ठिकाणी गुगल मीट, झूम अशा प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

यावेळी शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या
-विज्ञान – ७ लाख ९९ हजार ६७३
-कला – ३ लाख ८० हजार ६१२
-वाणिज्य – ३ लाख २० हजार १५२
-व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २७ हजार ३४८
-टेक्निकल सायन्य – ४ हजार ४९२
-एकूण विद्यार्थी – १५ लाख ३२ हजार ४८७

बारावीच्या विद्यार्थींची मागील आणि आताची आकडेवारी
तपशील – फेब्रुरवारी- मार्च २०२५ – फेब्रुरवारी- मार्च २०२५ – विद्यार्थी संख्येत वाढ
मुले – ८ लाख १० हजार ३४८ – ८ लाख २० हजार २२९ – ९ हजार ८८१
मुली – ६ लाख ९४ हजार ६५२ – ७ लाख १२ हजार २४० – १८ हजार ५८८
ट्रान्सर्जेंडर – ३७ – १८ – १९
एकूण विद्यार्थी संख्या – १५ लाख ५ हजार ३७ – १५ लाख ३२ हजार ४८७ – २७ हजार ४५०

विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या

पुणे – २ लाख ६० हजार १४

नागपूर – १ लाख ६० हजार ५३०

छत्रपती संभाजीनगर – १ लाख ९१ हजार ४९३

मुंबई – ३ लाख ५२ हजार ७१८

कोल्हापूर – १ लाख १६ हजार ६११

अमरावती – १ लाख ५६ हजार ९१५

नाशिक – १ लाख ७३ हजार ६५१

लातूर – ९६ हजार ५४२

कोकण – २४ हजार १३

Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

कॉपीमुक्त अभियान; कडक कारवाईचा इशारा
राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत
-परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येतील.
-आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील.
-ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध आहे तेथे परीक्षेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
-परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यास कारवाई करण्यात येईल.
-महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा, १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Hsc exam start tomorrow cctv gmeet strict action against copy career students marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • HSC
  • hsc exam
  • Students

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
2

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
4

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.