Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam 2026: पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, भरारी पथकाची मोठी कारवाई

मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2026 | 02:48 PM
पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, 137 केंद्रांवर परीक्षा शांततेत

पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई, 137 केंद्रांवर परीक्षा शांततेत

Follow Us
Close
Follow Us:
  • पहिल्याच दिवशी २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई
  • 137 केंद्रांवर परीक्षा शांततेत
  • अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला
अमरावती : महाराष्ट्र राज्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Exam) परीक्षा मंगळवारपासून (दि. १०) सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने ‘कॉपीमुक्त’ परीक्षा घडवण्याचा दावा केला असला, तरी पहिल्याच दिवशी वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, तर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात एकही गैरप्रकार आढळले नाही. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला. वाशिम विभागात एकूण २० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

या वर्षी अकोल्यातून २७ हजार ०३५, अमरावतीतून ३५ हजार ९२९, बुलढाण्यातून ३६ हजार ३६४,यवतमाळातून ३५ हजार ५७० आणि वाशिममधून २२ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला हजेरी लावली. बुलढाण्यात किमान ८ अनियंत्रित केंद्रे आणि अमरावतीत सर्वाधिक ३४ अनियंत्रित केंद्रे असल्याने प्रशासनाने सुमारे ८५ टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर उर्वरित १५ टक्के केंद्रांवर कड़क उपाययोजना राबविण्यात आल्या. अमरावतीतील १३७ परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.

 वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

१३७ केंद्रांवर परीक्षा शांततेत

धारणी व चिखलदरा तालुक्यातील संवेदनशील केंद्रांवर आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मेळघाटातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा आणि विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा उपलब्ध ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परीक्षेत कॉपी अथवा गैरप्रकार आढळल्यास ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रक्टिस अॅक्ट १९८२’ अंतर्गत तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३४, १८८ व १२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला.

याशिवाय परीक्षा केंद्रात बसून नऊ सहाय्यक पथ-रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय केंद्राच्या संकुलातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भरारी पथ स्वतः मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना भेट देत असून दक्षता समितीची भरारी पथकेही कोणतीही पूर्व सुचना न देता आक्सिमतपणे परीक्षा केंद्राना भेटी देणार आहे. ज्या केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ते पुढील वर्षापासून बंद केले जातील. नाशिक विभागात २८५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि २६२ केंद्रीय सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिक्षण, कस्टम, जिल्हा परिषद यांच्याशी संलग्न विभाग कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागात एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळला नाही. जळगाव विभागातील पाचोरा येथे चार विद्यार्थी कॉपी करताना आढळले. दुसरीकडे, परीक्षेच्या सुरुवातीला आणि परीक्षा संपल्यानंतर, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळातच दुसऱ्या सत्रात शाळा आणि महाविद्यालये भरल्याने वाहतुक कोंडीत भर पडली.

IAS Avinash : अपयशाने खचला नाही… यश त्याच्या कष्टासमोर वाचला नाही! मेहनत असावी तर अशी

Web Title: Hsc board exam starts amravati copying cases english paper news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • amravati
  • HSC
  • HSC Exam 2026

संबंधित बातम्या

Amravati News : मोदींचा काटकसरीचा मंत्र अन् सोशल मीडियावर वादाची ठिणगी
1

Amravati News : मोदींचा काटकसरीचा मंत्र अन् सोशल मीडियावर वादाची ठिणगी

Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार
2

Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार

Amravati Crime: अमरावतीत सेल्फीचा जीवघेणा मोह! तलावात बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; काय घडलं नेमकं?
3

Amravati Crime: अमरावतीत सेल्फीचा जीवघेणा मोह! तलावात बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; काय घडलं नेमकं?

कापूस उत्पादकासाठी स्वतंत्र उत्पादकता मिशन! केंद्र शासनसतर्फे ‘मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी’ जाहीर
4

कापूस उत्पादकासाठी स्वतंत्र उत्पादकता मिशन! केंद्र शासनसतर्फे ‘मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी’ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.