Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commercial Pilots in India: भारतात दर चौथा कमर्शियल पायलट महिला! पायलट बनण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते? जाणून घ्या

Women Commercial Pilot Eligibility: भारतात कमर्शियल पायलट कसे बनायचे? CPL लायसन्स प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, ट्रेनिंगचा खर्च आणि सुरुवातीचा पगार याबद्दलची संपूर्ण माहिती एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 30, 2026 | 03:15 PM
pilot

pilot

Follow Us
Follow Us:

Women Commercial Pilot Eligibility: भारताचे नागरी विमानचालन क्षेत्र वेगाने विस्तारत आहे आणि त्यासोबतच ‘कमर्शियल पायलट’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. नागरी विमानचालन मंत्रालयाने राज्यसभेत प्रसिद्ध केलेली आकडेवारी दर्शवते की, देशात महिला कमर्शियल पायलटचा सहभाग सातत्याने वाढत आहे. ३० जून २०२६ पर्यंत जारी केलेल्या दर चार कमर्शियल पायलट लायसन्सपैकी सुमारे एक लायसन्स महिला उमेदवाराला मिळाले आहे.

आशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, कमर्शियल पायलट बनण्यासाठी काय पात्रता लागते? तसेच त्यांना सुरुवातीस त्यांना पगार किती असतो?

भारतात दर चौथा कमर्शियल पायलट महिला

नागरी विमानचालन मंत्रालयानुसार, ३० जून २०२६ पर्यंत एकूण १,३३१ कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) जारी करण्यात आले. यामध्ये ३४८ लायसन्स महिलांना मिळाले, म्हणजेच महिलांचा एकूण वाटा २६.१४ टक्के राहिला. तर २०२१ मध्ये ८६२ सीपीएम जारी झाले होते, ज्यामध्ये १६६ महिलांना लायसन्स मिळाले होते. महिला वैमानिकांच्या सहभागाच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये समाविष्ट आहे.

कमर्शियल पायलट बनण्यासाठी पात्रता

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने १२ वी परीक्षा फिजिक्स आणि मॅथ्स या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ओपन स्कूल पर्याय: जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत फिजिक्स किंवा मॅथ्स वाचलेले नसेल, तर तो मान्यताप्राप्त ‘ओपन स्कूल’द्वारे या विषयांची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पात्रता मिळवू शकतो.

वयोमर्यादा: उमेदवाराचे किमान वय १७ वर्षे असावे, तर ‘कमर्शियल पायलट लायसन्स’ मिळवण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

वैद्यकीय चाचणी: प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी डीजीसीएची (DGCA) मेडिकल फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागते.

Bullet Train Driver Eligibility: भारतात बुलेट ट्रेन ड्रायव्हर कसे बनायचे? जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया!

Commercial Pilot License कसे मिळते?

१. कमर्शियल पायलट बनण्यासाठी सर्वात आधी DGCA च्या कॉम्प्युटर नंबरसाठी अर्ज करावा लागतो.
२. यानंतर ग्राउंड ट्रेनिंग दरम्यान एअर रेग्युलेशन, एअर नॅव्हिगेशन, एव्हिएशन मेटिओरॉलॉजी (हवामानशास्त्र) आणि इतर विषयांचा अभ्यास केला जातो.
३. DGCA च्या लेखी परीक्षेत निश्चित गुण मिळवल्यानंतर फ्लाइट ट्रेनिंग पूर्ण करावी लागते.
४. CPL साठी किमान २०० तासांचे फ्लाइंग ट्रेनिंग अनिवार्य असते. यामध्ये सोलो फ्लाइंग, क्रॉस कंट्री फ्लाइंग, नाइट फ्लाइंग, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि मल्टी इंजिन विमानाचे प्रशिक्षण समाविष्ट असते.
५. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आणि स्किल टेस्ट पास केल्यानंतर DGCA ‘कमर्शियल पायलट लायसन्स’ जारी करते.

किती मिळतो पगार?

लायसन्स मिळाल्यानंतर सुरुवातीला उमेदवाराला ‘ट्रेनी पायलट’ किंवा ‘फर्स्ट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती मिळते. या काळात वार्षिक १२ लाख ते २५ लाख रुपये पर्यंतचे पॅकेज मिळते. ते अनुभवानुसार वाढत जाऊन २५ ते ५० लाख रुपये वार्षिक पर्यंत पोहोचू शकतो. तसेच कॅप्टन बनल्यानंतर अनेक एअरलाइन्समध्ये वार्षिक पॅकेज १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ वैमानिकांची कमाई यापेक्षाही जास्त असते.

Government Jobs 2026: १० वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; येत्या काही महिन्यांत ‘या’ मोठ्या सरकारी पदांसाठी बंपर भरती

पगाराव्यतिरिक्त मिळणारे इतर फायदे

कमर्शियल पायलटला पगाराव्यतिरिक्त ट्रॅव्हल अलाउन्स, हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, फॉरेन लेओव्हर, मोफत एअर तिकिटे आणि इतर भत्ताही मिळतात. मात्र, पायलट ट्रेनिंगचा खर्चही खूप जास्त असतो. भारतात CPL ट्रेनिंगसाठी सहसा ४० ते ८० लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, तर परदेशातून प्रशिक्षण घेतल्यास हा खर्च १ कोटी रुपयांपेक्षा जास्त जाऊ शकतो.

Web Title: How to become commercial pilot in india eligibility cpl cost and salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
1

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
2

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
3

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
4

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.