Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी उपाय! हे टिप्स फॉलो कराल तर नक्कीच वर्गात पहिले याल

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता सहज विचलित होते.मल्टीटास्किंग टाळून अभ्यासाच्या वेळी मोबाईल दूर ठेवल्यास लक्ष अधिक केंद्रित राहते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, रील्स, मेसेजेस आणि ऑनलाइन कंटेंटमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून सहज विचलित होते. अनेक विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात, तासन्‌तास पुस्तकासमोर बसतात, पण थोड्याच वेळात शिकलेले विसरून जातात. यामागचे मुख्य कारण म्हणजे अभ्यासात आवश्यक असलेली एकाग्रता टिकून न राहणे. जर अभ्यास करताना तुमचे लक्ष वारंवार भटकत असेल, तर काही वैज्ञानिक आणि प्रभावी उपाय अवलंबून तुम्ही तुमची एकाग्रता नक्कीच वाढवू शकता.

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ‘मल्टीटास्किंग’ टाळणे. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना मोबाईल पाहणे, गाणी ऐकणे किंवा सोशल मीडिया स्क्रोल करणे अशी अनेक कामे एकाच वेळी करतात. मात्र, संशोधनानुसार एकाचवेळी अनेक कामे केल्याने मेंदूवर ताण येतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अभ्यासाच्या वेळी मोबाईल सायलेंट किंवा दूर ठेवणे आणि संपूर्ण लक्ष फक्त एका विषयावर केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि लक्षात राहतो.

अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी ‘पोमोडोरो तंत्र’ खूप उपयुक्त ठरते. या तंत्रानुसार ३० ते ४० मिनिटे सलग अभ्यास करायचा आणि त्यानंतर ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा. असे चार सत्र पूर्ण झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांचा मोठा ब्रेक घ्यावा. हे छोटे ब्रेक मेंदूला ताजेतवाने ठेवतात, थकवा कमी करतात आणि अभ्यासातील उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतात. सतत तासन्‌तास अभ्यास करण्यापेक्षा अशा पद्धतीने अभ्यास केल्यास लक्ष अधिक काळ टिकते.

‘माइंड मॅपिंग’ तंत्र हेही एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. या पद्धतीत विषय फक्त लिहून न शिकता, त्याचे चित्र, आकृती, फ्लोचार्ट किंवा रंगीत नोट्सच्या स्वरूपात सादरीकरण केले जाते. मुख्य मुद्दा मध्यभागी लिहून त्याभोवती उपमुद्दे काढले जातात. यामुळे मेंदूला विषय दृश्य स्वरूपात समजतो आणि तो दीर्घकाळ लक्षात राहतो. परीक्षेपूर्वी पुनरावृत्ती करणेही या तंत्रामुळे सोपे होते.

परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज! किती कर्जाची आवश्यकता आहे? फुल ऑन गॅरंटी

याशिवाय अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शांत, स्वच्छ आणि प्रकाशयुक्त जागा निवडावी. अभ्यासाच्या जागी अनावश्यक वस्तू, टीव्ही किंवा मोबाईल नसावा. ठराविक वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास मेंदू त्या सवयीला सरावतो आणि एकाग्रता आपोआप वाढते. एकूणच, सोशल मीडियाच्या गर्दीत अभ्यास करणे जरी कठीण झाले असले, तरी योग्य तंत्र, शिस्त आणि सवयी लावल्यास एकाग्रता वाढवणे नक्कीच शक्य आहे. थोडा संयम, नियोजन आणि सातत्य ठेवले, तर अभ्यास अधिक प्रभावी होईल आणि यशाचा मार्ग सुकर बनेल.

Web Title: How to study proper in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.