Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील माझगाव येथील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन !

मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले

  • By नारायण परब
Updated On: Sep 20, 2024 | 11:04 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. या कार्यक्रमास आमदार श्रीमती यामिनी जाधव, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव हे उपस्थित होते.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, या अनुषंगाने राज्यामधील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.

या आचार्य चाणक्य कौशल्य विकास १००० केंद्रांचा उद्घाटन समारंभ २० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.१२.३० वा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न झाला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयतर्गत १२ महाविद्यालये या कार्यक्रमात सहभागी झाले.

हे देखील वाचा-SBI Asha Scholarship: विद्यार्थ्यांसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशीप, 1 ऑक्टोबर 2024 अर्जाची शेवटची तारीख

यावेळी श्रीमती यामिनी जाधव यांनी तरूणांनी त्यांच्यामधील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे रोजगार,स्वयंरोजगार प्राप्त करावा असे आवाहन केले. तसेच श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये  एकूण १२ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहरचे सहायक आयुक्त संदिप गायकवाड, बुरहानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल कादीर भाईसाहेब तमीम, डॉ.हुजेफा हुसैन,बुरहानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. हुजफा भगत ,मुरतुझा मंदसौरवाला उपस्थित होते.

हे देखील वाचा- कर्मचाऱ्यांकडून ओवर वर्क करण्यामध्ये भारतातील कंपन्यांचा दुसरा क्रमांक,’या’ देशांमध्ये दिले जाते वर्क लाईफ बॅलेन्सला महत्त्व

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. राज्यातील कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये कौशल्य विकास व्हावे यासाठीच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरु केली जात आहेत. त्यामुळे शहरातील आणि गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला याचा प्रचंड फायदा होणार आहे. या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयातील केंद्रामध्ये 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा पध्दतीने प्रत्येक महाविद्यालयात प्रशिक्षणानुसार वर्षभरात तब्बल दीड लाख तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 आपल्या जवळच्या कौशल्य विकास केंद्राबद्दल जाणून घेण्यासाठी  इथे  क्लिक करा.  

Web Title: Inauguration of acharya chanakya skill development centers at mazgaon in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 11:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • narendra modi

संबंधित बातम्या

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!
1

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
4

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.