
Image
डीपटेक यू-हब एकूण सात लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येईल. यामध्ये पाच लाख चौरस फुटांचे केंद्र आयआयटी कानपूरच्या नोएडा परिसरात आणि दोन लाख चौरस फुटांचे केंद्र आयआयआयटी लखनौच्या परिसरात स्थापन केले जाईल. याचे संचालन उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत ‘यूपी स्टार्टअप मिशन’च्या माध्यमातून होईल. कंपनी कायदा-२०१३ अंतर्गत ना-नफा तत्त्वावरील ‘कलम-८ कंपनी’ म्हणून याची नोंदणी केली जाईल. या हबच्या ११ सदस्यीय मंडळाचे अध्यक्षपद आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. मणींद्र अग्रवाल भूषवतील.
डीपटेक यू-हब हे उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेले एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रम केंद्र आहे. राज्यात वैज्ञानिक संशोधनावर आधारित स्टार्टअप्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
या हबच्या मंडळात सरकार, शिक्षण, उद्योग, व्हेंचर कॅपिटल आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असेल. आयआयटीचे संचालक प्रा. मणींद्र अग्रवाल म्हणाले की, “स्टार्टअप्सना सुरुवातीच्या तांत्रिक संशोधनापासून पुढे नेऊन देशाच्या गरजा पूर्ण करणारे उपाय विकसित करण्यास मदत करणे, हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.”
प्रकल्प संचालक प्रा. दीपू फिलिप म्हणाले की, “चांगले संशोधन अनेकदा प्रोटोटाइप तयार झाल्यानंतरही यशस्वी व्यवसायात रूपांतरित होऊ शकत नाही. प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या सखोल वैज्ञानिक संशोधनाचे अशा तंत्रज्ञान आणि उत्पादनांमध्ये रूपांतर करणे हा या हबचा उद्देश आहे, ज्यांची मालकी भारताकडे असेल. सध्या अनेकदा शास्त्रज्ञ नवे तंत्रज्ञान आणि प्रोटोटाइप तयार करतात; पण त्यांना व्यावसायिक उत्पादन किंवा कंपनीचे स्वरूप देण्यात अडचणी येतात. हा हब या आव्हानावर मात करेल.”
Anand Kumar Super 30: ‘पालक आता म्हणतात थोडा टीव्ही….’; आनंद कुमार यांनी मांडली आजच्या पिढीची व्यथा
प्रा. मणींद्र अग्रवाल म्हणाले की, “आमच्या अलीकडील ‘ग्रेटर दैन अस’ मोहिमेद्वारे आम्ही सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांची ओळख पटवली आहे. आमच्याकडे आधीपासून असलेली ज्ञानसंपदा या ‘यू-हब’ला पुढे नेण्यास मदत करेल. स्टार्टअप्सना तांत्रिकदृष्ट्या सज्ज करण्यापासून ते देशाच्या उपयोगी पडतील असे उपाय विकसित करण्यापर्यंत आमचे काम असेल. तसेच भारतातील सर्वोत्तम प्रतिभेला एक ठोस कारण देणे हाही हेतू आहे, जेणेकरून त्यांना आपल्या देशात आणि राज्यातच आपले भविष्य घडवता येईल.”
Ans: हा हब आयआयटी कानपूरच्या नोएडा (सेक्टर-६२) परिसरात आणि आयआयआयटी लखनौ येथे उभारला जाणार असून, त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने २८१.०३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Ans: या हबमध्ये फिजिकल एआय, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, मेडटेक आणि संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील स्टार्टअप्सना चालना दिली जाईल.
Ans: हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असून, याचे संचालन उत्तर प्रदेश सरकारच्या 'यूपी स्टार्टअप मिशन' अंतर्गत ना-नफा तत्त्वावरील 'कलम-८ कंपनी' म्हणून केले जाईल.