Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army Internship: भारतीय सैन्यात इंटर्नशिपची संधी! विद्यार्थ्यांना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड

Indian Army Internship 2026-27: अभ्यासासोबतच देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर 'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७' हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 24, 2026 | 03:54 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • भारतीय लष्करात इंटर्नशिपची मोठी संधी
  • विद्यार्थ्याना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड
  • अर्ज कसा करावा?
Indian Army Internship 2026-27: अभ्यासासोबतच देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर ‘इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७’ (दुसरी आवृत्ती) हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. या कार्यक्रमांतर्गत निवडक विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, ड्रोन आणि डेटा ॲनालिसिस यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये लष्कराच्या प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

प्रोजेक्ट्स आणि कालावधी:

या प्रोग्राममध्ये तंत्रज्ञान, संशोधन आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित सुमारे ४३ वेगळे प्रोजेक्ट्स समाविष्ट आहेत. यात एआय, मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5G/6G तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी, तसेच फिनटेक व हॉस्पिटॅलिटी सिस्टीमचा समावेश आहे. ही इंटर्नशिप एकूण ७५ दिवसांची असेल. यामध्ये ६० दिवस प्रत्यक्ष ऑफिस/फील्ड ट्रेनिंग आणि १५ दिवस ‘वर्क फ्रॉम होम’चा समावेश आहे.

स्टायपेंड आणि फायदे:

मानधन: इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना कमाल ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाऊ शकतो (प्रत्येक प्रोजेक्टनुसार रक्कम वेगवेगळी असू शकते). यासाठी किमान ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!

क्रेडिट्स व प्रमाणपत्र: यशस्वी उमेदवारांना AICTE मानकांनुसार १५ शैक्षणिक क्रेडिट्स आणि भारतीय सैन्याकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.

पात्रता आणि अटी:

बी.टेक (BTech), बी.ई., कॉम्प्युटर सायन्स, एआय, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीचे शिक्षण घेणारे किंवा नुकतेच पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी यातील विविध प्रोजेक्ट्ससाठी पात्र आहेत.

इतर अटी: उमेदवारांची निवड झाल्यानंतर पोलीस पडताळणी अनिवार्य असेल. सैन्याकडून राहण्याची किंवा येण्या-जाण्याची कोणतीही सोय केली जाणार नाही. तसेच ही इंटर्नशिप पूर्ण केल्यावर सैन्यात नोकरीची गॅरंटी दिली जात नाही.

Youngest Genius: वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी कमाल! ३००० पुस्तके वाचणाऱ्या ५ वर्षांच्या अर्जुनचा विधानसभेत होणार विशेष सन्मान!

अर्ज कसा करावा?

इच्छुक विद्यार्थी AICTE च्या अधिकृत पोर्टल internship.aicte-india.org वर जाऊन त्यांच्या आवडीच्या प्रोजेक्टनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रत्येक प्रोजेक्टची अंतिम तारीख आणि पात्रता अटी वेगवेगळ्या असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवरील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७ चा कालावधी किती असणार आहे?

    Ans: ही इंटर्नशिप एकूण ७५ दिवसांची असेल, ज्यामध्ये ६० दिवस प्रत्यक्ष ऑफिस/फील्ड ट्रेनिंग आणि १५ दिवस 'वर्क फ्रॉम होम'चा समावेश आहे.

  • Que: या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना किती स्टायपेंड मिळणार आहे?

    Ans: इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना प्रोजेक्टनुसार कमाल ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड आणि AICTE मानकांनुसार १५ शैक्षणिक क्रेडिट्स मिळू शकतात.

  • Que: या इंटर्नशिपसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

    Ans: इच्छुक विद्यार्थी AICTE च्या अधिकृत पोर्टल internship.aicte-india.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Web Title: Indian army internship program 2026 27 stipend apply online marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • indian army
  • pm internship scheme
  • Salary

संबंधित बातम्या

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
1

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
2

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?

Microsoft Internship 2026: मायक्रोसॉफ्टची धमाकेदार इंटर्नशिप! दरमहा ६ ते १३ लाख रुपयांपर्यंत मिळणार स्टायपेंड
3

Microsoft Internship 2026: मायक्रोसॉफ्टची धमाकेदार इंटर्नशिप! दरमहा ६ ते १३ लाख रुपयांपर्यंत मिळणार स्टायपेंड

Indian Army : ये नया Bharat हैं! लढाऊ विमाने असोत वा सूक्ष्म ड्रोन; ‘ही’ ठरणार भारताची ताकद
4

Indian Army : ये नया Bharat हैं! लढाऊ विमाने असोत वा सूक्ष्म ड्रोन; ‘ही’ ठरणार भारताची ताकद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.