Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army Women Recruitment 2026: महिला इंजिनिअर्ससाठी लष्कराची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Indian Army Women Recruitment 2026: भारतीय लष्कराने ६८ व्या SSC (Tech) महिला कोर्ससाठी भरती सुरू केली आहे. अविवाहित महिला इंजिनिअर्स ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. सविस्तर पात्रता येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 09, 2026 | 10:18 AM
आर्मी

आर्मी

Follow Us
Follow Us:

Indian Army Women Recruitment 2026: जर तुम्ही अविवाहित महिला इंजिनिअरिंग पदवीधर (Engineering Graduate) असाल आणि भारतीय सेनेत (Indian Army) अधिकारी बनण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय सेनेने ६८ व्या शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) तांत्रिक महिला अभ्यासक्रमासाठी (Technical Women Course) अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांना ८ जुलै २०२६ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण एप्रिल २०२७ पासून बिहारमधील गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये सुरू होईल.

या भरतीसाठी केवळ अविवाहित महिला इंजिनिअरिंग पदवीधरच अर्ज करू शकतात. इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनींनाही यात संधी देण्यात आली आहे, मात्र अट अशी आहे की त्यांचा अंतिम निकाल १ एप्रिल २०२७ पर्यंत जाहीर झालेला असावा. याव्यतिरिक्त, कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी तांत्रिक (Technical) आणि बिगर-तांत्रिक (Non-Technical) अशा दोन्ही श्रेणींमध्ये विशेष प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे.

कोण करू शकते अर्ज?

वयोमर्यादा: SSC (Tech)-68 अभ्यासक्रमासाठी उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२७ रोजी २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००० ते ३१ मार्च २००७ च्या दरम्यान झालेला असावा.

शहीद जवानांच्या पत्नींसाठी शिथिलता: शहीद झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

शारीरिक फिटनेस अनिवार्य

धावणे: उमेदवारांना १३ मिनिटांत २.४ किलोमीटर धावणे पूर्ण करावे लागेल.

इतर व्यायाम: याशिवाय १५ पुश-अप्स (Push-ups), २ पुल-अप्स (Pull-ups) आणि २५ सिट-अप्स (Sit-ups) करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

पोहणे: प्रशिक्षण काळात अडचण येऊ नये म्हणून उमेदवारांना पोहण्याचे करता येणे आवश्यक आहे.

Bank Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया

अशी होईल निवड

शॉर्टलिस्टिंग: सर्वात आधी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.

SSB इंटरव्यू: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ५ दिवसांच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) इंटरव्यूसाठी बोलावले जाईल.

वैद्यकीय चाचणी: एसएसबी इंटरव्यूमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय (Medical) तपासणी होईल.

अंतिम गुणवत्ता यादी: सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) जाहीर केली जाईल आणि निवडक उमेदवारांना जॉइनिंग लेटर पाठवले जाईल.

Inspiring Story: शारीरिक अपंगत्वाला बनवली स्वतःची ताकद! तीन फुटांच्या ‘या’ डॅशिंग शिक्षकाचा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना Join Indian Army च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

२. सर्वात आधी “Officer Entry Apply/Login” वर क्लिक करून नोंदणी करावे लागेल.

३. यानंतर तुमच्या आवश्यक प्रमाणपत्रांनुसार पडताळणी (Verification) पूर्ण करा.

४. लॉगिन केल्यानंतर Short Service Commission (Technical) Course ची निवड करा आणि आपली वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती अचूक भरा.

५. सर्व तपशील नीट तपासून घेतल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट (Submit) करा.

Web Title: Indian army women recruitment 2026 ssc tech apply online ota gaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • government jobs
  • High salary Job
  • indian army

संबंधित बातम्या

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
1

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
2

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
3

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
4

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.