Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्य शासनाने मोठा निर्णय घेत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज ही माहिती दिली.तसेच आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून मंत्रालयात संविधान मंदिर स्थापन झाले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 14, 2024 | 07:58 PM
महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
Follow Us
Close
Follow Us:

राज्य शासनाच्या  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. या  निर्णयाबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज ही माहिती दिली. श्री रतन टाटा यांचे विविध क्षेत्रांच्या व उद्योगांच्या विकासासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे. त्याचबरोबर नवीन उद्योगांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन सहकार्य केले. उद्योग क्षेत्रातील या महान विभूतीच्या कार्याला आदरांजली देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे तसेच नवोदितांच्या संकल्पनांना बळ देण्याचे उद्दिष्ट आहे. हा उद्देश श्री रतन टाटा यांच्या विचारांचा आरसा असून त्याचे आचरण म्हणजेच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली आहे. या नामकरणामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या तांत्रिक प्रगतीस चालना मिळेल आणि युवकांना श्री. रतन टाटा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याचा अभिमान वाटेल.

विद्यापीठास रतन टाटांचे नाव मिळावे ही अतिशय सन्मानाची गोष्ट

याबाबत पत्रकारांशी संवाद साधतांना मंत्री लोढा म्हणाले “पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. तांत्रिक, औद्योगिक सर्वच क्षेत्रात टाटा समूहाचे नाव अग्रणी आहे. अनेकांना कौशल्य प्रदान करून रोजगार त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे भारतातील पहिला कौशल्य विद्यापीठास त्यांचे नाव मिळावे ही अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निर्णयास पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो”

मंत्रालायात स्थापन झाले संविधान मंदिर

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून राज्यातील सर्व औद्योगिक संस्थांमध्ये जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण झाले. आपले संविधान आणि त्याचे महत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उभा उपक्रमाचा उद्देश आहे. त्याप्रमाणेच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात देखील संविधान मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे संविधानाचे मूल्ये अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास अधिक मदत होईल.

Web Title: Industrialist ratan tatas name for maharashtra skill development university cabinet minister mangal prabhat lodha gave the information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 07:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?
2

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
4

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.