Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: पुलावर अचानक बसचे नियंत्रण सुटले, पोल उडवत डिव्हायडरवर धडकली; ओझर-पिंपळगाव महामार्गावर अनेक प्रवासी जखमी

शिरपूरहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर अचानक अनियंत्रित झाली. बसने रस्त्याच्या कडेला असलेले लाईटचे पोल उडवत थेट डिव्हायडरला धडक दिली. भीषण धडकेनंतर अनेक प्रवासी जखमी झाले असून, महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 21, 2026 | 04:18 PM
Accident News: पुलावर अचानक बसचे नियंत्रण सुटले, पोल उडवत डिव्हायडरवर धडकली; ओझर-पिंपळगाव महामार्गावर अनेक प्रवासी जखमी

Accident News: पुलावर अचानक बसचे नियंत्रण सुटले, पोल उडवत डिव्हायडरवर धडकली; ओझर-पिंपळगाव महामार्गावर अनेक प्रवासी जखमी

Follow Us
Follow Us:
  • ओझर-पिंपळगाव पुलावर शिरपूर-नाशिक एसटीचा भीषण अपघात
  • नियंत्रण सुटल्याने बसने पोल उडवून डिव्हायडरला दिली धडक
  • अनेक प्रवासी जखमी; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

नाशिक : ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर बुधवारी दुपारी शिरपूर-नाशिक एसटी बसचा भीषण अपघात झाला. शिरपूरहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या कडेला असलेले काही लाईटचे पोल उडवले आणि त्यानंतर थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पुलावरच हा अपघात झाल्याने बसच्या धडकेचा मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही जणांना किरकोळ, तर काहींना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आमदार दिलीप बनकर घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळावेत आणि मदतकार्य वेगाने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा: जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार

महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

अपघातानंतर ओझर-पिंपळगाव महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. दरम्यान, अपघातातील जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. या अपघाताचा ओझर पोलीस पुढील तपास करीत आहेत. एसटी महामंडळाकडूनही या घटनेची चौकशी होण्याची शक्यता आहे. मागील काही काळात एसटी बसच्या अपघातांच्या घटना वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी बसचा अपघात कुठे झाला?

    Ans: ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर हा अपघात झाला.

  • Que: अपघातग्रस्त बस कुठून कुठे जात होती?

    Ans: शिरपूरहून नाशिककडे ही बस जात होती.

  • Que: अपघातानंतर काय उपाययोजना करण्यात आल्या?

    Ans: ओझर पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी पाठवले आणि अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Ozar pimpalgaon highway st bus accident nashik sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Accident in Nashik
  • Bus Accident
  • maharashtra
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी
1

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी

Bhandara News: भंडाऱ्यात ९ महिन्यांत ७,२९६ जणांना चावले कुत्र्यांनी! नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
2

Bhandara News: भंडाऱ्यात ९ महिन्यांत ७,२९६ जणांना चावले कुत्र्यांनी! नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण
3

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल
4

Torent Dam: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.