Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया

Indian Overseas Bank Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) ७५० अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. पदवीधरांना २० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. पात्रता, फी आणि निवड प्रक्रियेची माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 09, 2026 | 09:36 AM
bank

bank

Follow Us
Follow Us:

Indian Overseas Bank Recruitment 2026: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देशभरात ७५० अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया ७ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या भरती मोहिमेद्वारे देशभरात एकूण ७५० पदे भरली जातील. यामध्ये सर्वाधिक २०० पदे तामिळनाडूमध्ये आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ८५, उत्तर प्रदेशात ११०, दिल्लीत ५३ आणि बिहारमध्ये ३५ पदांवर भरती केली जाईल. वेगवेगळ्या राज्यांसाठी पदांची संख्या वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा काय असेल?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये वयाची गणना १ जुलै २०२६ या तारखेच्या आधारे केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे ठरवण्यात आले असून सामान्य प्रवर्गाला ९४४ रू ओबीसी आणि ईडब्ल्यूएस  ७०८ रू तसेच
एससी, एसटी आणि दिव्यांग २३६ रु भरावे लागेल.

Inspiring Story: शारीरिक अपंगत्वाला बनवली स्वतःची ताकद! तीन फुटांच्या ‘या’ डॅशिंग शिक्षकाचा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच

निवड प्रक्रिया कशी होणार?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या (Written Exam) आधारे केली जाईल. परीक्षेत जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज आणि संबंधित विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारेच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

मानधन (Stipend) किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगदरम्यान दरमहा खालीलप्रमाणे स्टायपेंड (मानधन) दिले जाईल:

  • मेट्रो (Metro) शाखा: ₹ १५,५००/- प्रति महिना
  • शहरी (Urban) शाखा: ₹ १४,५००/- प्रति महिना
  • निमशहरी किंवा ग्रामीण (Semi-Urban/Rural) शाखा: ₹ १४,०००/- प्रति महिना
Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..

अर्ज कसा करावा?

१. सर्वप्रथम इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.iob.in वर जा.

२. होम पेजवर ‘Careers’ विभागात Apprentice Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करा.

३. तुमची नोंदणी (Registration) करा आणि अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरा.

४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी (Signature) स्कॅन करून अपलोड करा.

५. तुमच्या प्रवर्गाचे अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट काढून जतन करून ठेवा.

Web Title: Iob apprentice bank recruitment 2026 apply online direct link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Bank
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
1

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
2

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
3

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
4

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.