Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Jailer 2 Fame Rajinikanth Education: Jailer 2 च्या रिलीजदरम्यान रजनीकांत यांच्या शिक्षणाची आणि संघर्षाची कहाणी चर्चेत आली आहे. शालेय जीवनातील अडचणींवर मात करून कसे बनले थलैवा? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 15, 2026 | 03:21 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Jailer 2 Fame Rajinikanth Education: दक्षिण भारताचे ‘थलैवा’ आणि गॉडफादर मानले जाणारे सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जेलर २’ आज, १५ ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘टाइगर मुथुवेल पांडियन’च्या भूमिकेत रजनीकांत यांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ६० कोटींहून अधिकची ॲडव्हान्स बुकिंग केली होती.

परंतु, ‘जेलर २’ च्या या अभूतपूर्व यशादरम्यान रजनीकांत यांच्या शिक्षणाची आणि संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज कोट्यवधींच्या दिलावर राज्य करणारे रजनीकांत शालेय वयात इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे पहिल्या बाकावरून थेट मागच्या बाकावर फेकले गेले होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

गव्हर्नमेंट शाळेत ९८% गुण, पण इंग्रजी माध्यमात बसला फटका

रजनीकांत (मूळ नाव: शिवाजीराव गायकवाड) यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गव्हर्नमेंट कन्नड मॉडेल प्रायमरी स्कूल, गवीपुरम येथून पूर्ण केले. प्राथमिक परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवून ते शाळेचे टॉपर राहिले होते.

परंतु, पुढील शिक्षणासाठी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना ‘आचार्य पाठशाळा हायस्कूल’ या इंग्रजी माध्यम शाळेत दाखल केले. माध्यम बदलल्यामुळे आणि इंग्रजी भाषेच्या अडसरमुळे रजनीकांत यांना अभ्यासात मोठा फटका बसला.

“प्राथमिक शाळेतील टॉपर असणारा मी, इंग्रजी माध्यमात आल्यावर थेट मागच्या बाकावर फेकला गेलो,” असे रजनीकांत यांनी स्वतः एका व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितले होते.

१० वीत नापास, पण शिक्षकांनी सावरले!

शालेय दिवसांत रजनीकांत यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (गणित) या विषयांची प्रचंड भीती वाटत असे. ८ वी आणि ९ वी मध्ये शिक्षकांच्या मदतीने कसेबसे उत्तीर्ण झाल्यानंतर ते १० वीच्या परीक्षेत नापास झाले होते. मात्र, एपीएस हायस्कूलच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी अतिरिक्त क्लासेस घेऊन त्यांना पुन्हा शिकवले आणि उत्तीर्ण होण्यास मदत केली.

Internship Placement 2026: विद्यार्थ्यांची बॅटिंग! दरमहा ३.५ लाख रुपयांचे स्टायपेंड; १००% प्लेसमेंटचा रेकॉर्ड

याच शाळेतील भव्य मैदान आणि आंतरशालेय नाट्य स्पर्धांनी त्यांच्यातील कलाकाराला जन्म दिला. एपीएस हायस्कूलमध्ये नाटकातील कामगिरीसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ चा पहिला पुरस्कार मिळाला होता.

कुली, बस कंडक्टर ते ‘CBSE’ च्या पाठ्यपुस्तकातील धडा!

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेद, इतिहास आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात कुली (Coolie) आणि बंगळुरू वाहतूक विभागात बस कंडक्टर म्हणूनही काम केले.

NEET PG 2026: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! ‘या’ विषयात आहेत सर्वाधिक स्कोप

पुढे त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज रजनीकांत यांच्या या अभूतपूर्व यशाची आणि जिद्दीची कहाणी भारतातील CBSE च्या शालेय अभ्यासक्रमात ‘From Bus Conductor to Superstar’ या धड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवली जाते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रजनीकांत यांचे उच्च शिक्षण कोणत्या संस्थेत झाले?

    Ans: त्यांनी चेन्नईच्या मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.

  • Que: रजनीकांत यांना शालेय शिक्षणात कोणत्या अडचणी आल्या होत्या?

    Ans: कन्नड माध्यमातून इंग्रजी माध्यमात गेल्यावर भाषेच्या अडचणीमुळे आणि फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री या विषयांत ते मागे पडले होते.

Web Title: Jailer 2 fame rajinikanth education story release cbse syllabus sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • CBSC
  • education

संबंधित बातम्या

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
1

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

IIT Kanpur: AI च्या लाटेत २० वर्षांचा अनुभव ठरला अपुरा! IIT इंजिनिअर अमेरिकेत नोकरीसाठी भटकतोय; अशी झाली आर्थिक अवस्था
2

IIT Kanpur: AI च्या लाटेत २० वर्षांचा अनुभव ठरला अपुरा! IIT इंजिनिअर अमेरिकेत नोकरीसाठी भटकतोय; अशी झाली आर्थिक अवस्था

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
3

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
4

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.