Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jal Jeevan Mission: राज्यातील ६,३५७ शाळा-अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे कडक शासन आदेश; १५ नोव्हेंबरची डेडलाईन!

Jal Jeevan Mission Maharashtra: राज्यातील ६ हजार ३५७ शाळा-अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी आणि पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी वस्त्यांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 28, 2026 | 04:59 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ६ हजार ३५७ शाळा-अंगणवाड्यांतील पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश
  • वंचित वस्त्यांना नळजोडणी देण्यासाठी शासनाचे निर्देश
  • आदिवासी वस्त्यांसाठी १५ नोव्हेंबरची मुदत
सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे

Jal Jeevan Mission Maharashtra: राज्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांतील वंचित वाड्या-वस्त्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत शाळा-अंगणवाड्यांमधील पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नळजोडणीपासून वंचित राहिलेल्या आदिवासी वस्त्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

कक्ष अधिकारी अंजली बोडके यांनी शासन परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात शाळा आणि अंगणवाड्यांसाठी एकूण ६ हजार ६२९ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ६ हजार ३५७ योजनांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित २७२ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या योजनांमध्ये गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा सुरू असल्याची खात्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी. अपूर्ण योजनांच्या ठिकाणी कामे पूर्ण होईपर्यंत जवळच्या योजनेतून तात्पुरती नळजोडणी, टँकर किंवा पाण्याच्या टाकीद्वारे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत. यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

आदिवासी वस्त्यांना प्राधान्य

विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह (पीवीटीजी) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत येणाऱ्या दुर्गम वस्त्यांना पाणीपुरवठा योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. पीवीटीजी अंतर्गत समाविष्ट १६ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ३५२ योजना असून त्यापैकी २ हजार १८७ पूर्ण झाल्या आहेत, तर २ हजार १६५ योजना प्रगतिपथावर आहेत. या योजना डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा

पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी

आदिवासीबहुल भागांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची आणि नळजोडण्यांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेत वर्षातून एकदा रासायनिक आणि दोनदा जैविक तपासणी करावी. तसेच प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत दर महिन्याला जैविक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. वंचित वाड्या-वस्त्यांची लोकसंख्या, आवश्यक नळजोडण्या, वितरण व्यवस्था आणि अतिरिक्त निधी यांचा तपशील देऊन प्रस्ताव सादर करावेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शाळा आणि अंगणवाड्यांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत किती योजना मंजूर आहेत?

    Ans: राज्यात शाळा आणि अंगणवाड्यांसाठी एकूण ६ हजार ६२९ योजना मंजूर आहेत, ज्यापैकी ६ हजार ३५७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

  • Que: अपूर्ण नळजोडण्या असलेल्या आदिवासी वस्त्यांसाठी काय मुदत देण्यात आली आहे?

    Ans: वंचित राहिलेल्या आदिवासी वस्त्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

  • Que: पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी कशी केली जाणार आहे?

    Ans: पाण्याच्या स्रोतांची वर्षातून एकदा रासायनिक आणि दोनदा जैविक प्रयोगशाळा तपासणी होईल, तसेच प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत दर महिन्याला जैविक तपासणी केली जाईल.

Web Title: Jal jeevan mission maharashtra school anganwadi water supply marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • education
  • Maharashtra school
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो
1

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा
2

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात दिवाळी बोनससाठी आशा वर्कर आक्रमक; २ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा
3

Chandrapur News: चंद्रपुरात दिवाळी बोनससाठी आशा वर्कर आक्रमक; २ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Raigad News: भीमाशंकरमधील वृक्षतोड थांबवा! निसर्गप्रेमी मित्रमंडळाची प्रशासनाकडे मागणी
4

Raigad News: भीमाशंकरमधील वृक्षतोड थांबवा! निसर्गप्रेमी मित्रमंडळाची प्रशासनाकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.