Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात दिवाळी बोनससाठी आशा वर्कर आक्रमक; २ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

शेकडो आशा वर्करनी मंगळवारी चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयावर धडक दिली. यावेळी ३१ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे. आशा वर्करच्या आंदोलनानंतर मनपा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2026 | 01:04 PM
Chandrapur News: चंद्रपुरात दिवाळी बोनससाठी आशा वर्कर आक्रमक; २ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात दिवाळी बोनससाठी आशा वर्कर आक्रमक; २ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • बोनस न मिळाल्यास २ नोव्हेंबरपासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १७० आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कार्यरत
  • ३१ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी
चंद्रपूर: दिवाळीचा सण उलटून जात असतानाही सानुग्रह अनुदान न मिळाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात कार्यरत आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्करनी मंगळवारी महानगरपालिका कार्यालयावर धडक देत ३१ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी केली. ‘बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडणाऱ्या आंदोलकांनी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनूरी नरेश आणि स्थायी समिती सभापती मनस्वी गिहें यांना मंगळवारी निवेदन सादर केले.

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

येत्या पाच दिवसात बोनस न मिळाल्यास २ नोव्हेंबरपासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आयटकचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे पाटील यांनी दिला. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजांचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. (फोटो सौजन्य – AI Created) 

या मागणीसाठी प्रशासनाला पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ३१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर न झाल्यास २ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला. त्यामुळे आशा वर्करच्या बोनसचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, मनपा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात सविता गटलेवार यांच्यासह किरण धोंगडे, प्रमिला बावणे, शकुंतला दाभेकर, वर्षा मोरे, सोनाली हजारे, स्वाती तळसे, छाया तोडसे सहभागी झाल्या होत्या.

दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १७० आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी मंगळवारी (दि. २७) आयटकच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आशा वर्करनी घोषणाबाजी करत प्रशासनांचे लक्ष वेधले. कोरोना महामारीच्या संकटकाळात आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केले. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. आरोग्यसेवेतील या योगदानाची दखल घेऊन दिवाळीसाठी ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी आयटकची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास २ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल- विनोद झोडगे, राज्य उपाध्यक्ष

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur asha workers demand 31000 rupees diwali bonus warn of indefinite protest from november 2 hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा
1

Koyna Dam Water Dispute : आज पाणी सोडा, अन्यथा कोयना धरणावर धडकणार; राजू शेट्टी यांचा इशारा

Raigad News: भीमाशंकरमधील वृक्षतोड थांबवा! निसर्गप्रेमी मित्रमंडळाची प्रशासनाकडे मागणी
2

Raigad News: भीमाशंकरमधील वृक्षतोड थांबवा! निसर्गप्रेमी मित्रमंडळाची प्रशासनाकडे मागणी

Maharashtra School Textbooks: शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?
3

Maharashtra School Textbooks: शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?

Congo News :काँगोमध्ये इबोलाचा कहर; रुग्णसंख्या १० हजारांपार; आफ्रिकेत भीतीचे वातावरण
4

Congo News :काँगोमध्ये इबोलाचा कहर; रुग्णसंख्या १० हजारांपार; आफ्रिकेत भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.