सांगलीकरांवर आता पाणीटंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग तातडीने सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोयना धरणात ८९ टीएमसी पाणीसाठा असतानाही पाणी सोडलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कथित सत्ता संघर्षात सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरू नका, असा घणाघात शेट्टी यांनी केला. आज पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यासह कोयना धरणावर धडक देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.