
JEE TOPPER
JEE Advanced Topper 2026:अखेर जेईई ॲडव्हांस्ड २०२६ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. आयआयटी रुरकीने १७ मे २०२६ रोजी आयोजित केलेल्या जेईई ॲडव्हांस्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण १,८७,३८९ उमेद्वारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ५६,८८० उमेद्वार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवून ते जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चे टॉपर बनले आहेत. संपूर्ण भारतात अव्वल आलेल्या शुभमने जेईई मेनमध्येही १०० पर्सेटाईल गुणांसह टॉपर्सच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. जेईई ॲडव्हांस्डचे टॉपर शुभम कुमार कोण आहेत? ते कुठले रहीवासी आहेत? त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत? पहिली रंँक मिळवणाऱ्या शुभमचे माता-पिता काय करतात? शुभमला कोणत्या आयआयटी संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे? चला जाणून घेऊया ..
जेईई ॲडव्हांस्ड परीक्षा २०२६ मध्ये ऑल इंडिया रंँक मिळवणारे शुभम हे बिहारमधील गया येथील रहिवासी आहेत. या परीक्षेत त्यांनी ३६० पैकी ३३० गुण मिळवून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शुभम हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ते त्यांचे वडील, आई, आजोबा आणि बहीण श्रेया कुमारी यांसोबत राहतात. त्यांची बहीण इंजिनीअरिंगची तयारी करत असून ती आपल्या भावाच्या यशाने अत्त्यंत आनंदित आहे. त्यांच्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान असून आई गृहीणी आहे.
JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?
आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षा देणाऱ्या शुभम यांना आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) प्रवेश घ्यायचा असून तिथून ते कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणार आहेत. या संस्थेत प्रवेशामागचे मुख्य कारण म्हणचे येथून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश विदेशातील नामांकित आयटी कंपन्याकडून उत्कृष्ट सॅलरी पॅकेजची (नोकरीची) संधी मिळते.
शुभम कुमार जेईईच्या तयारीसाठी गेल्या दोन वर्षांपासून कोटा राजस्थान येथे राहत होते. येथे कोचिंग क्लास लावण्यासोबतच ते दररोज ८ तास स्वतः अभ्यास (सेल्फ स्टडी) करायचे. इयत्ता ११ वी मध्ये त्यांनी एलन (Allen)मधून ऑनलाईन क्लास घेतले होते, त्यानंतर १२ वी मध्ये त्यांनी एलनच्या कोटा सेंटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिक्षण घेतले. ते रोज सकाळी ६ तासांच्या ३ क्लासमध्ये उपस्थित रहायचे. अभ्यासात लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या शुभम यांना आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगची पदवी घ्यायची आहे.