
job
National Test House Young Professional Vacancy: भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल टेस्ट हाऊस’ (National Test House – NTH) मध्ये यंग प्रोफेशनल (Young Professional) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३६ जागा भरल्या जाणार आहेत. या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीवर असणार असून गाझियाबाद, कोलकाता, मुंबई, चेन्नई, जयपूर, गुवाहाटी, छत्रपती संभाजीनगर, बंगळुरू आणि वाराणसी यांसारख्या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
नॅशनल टेस्ट हाऊस ही विविध उत्पादने, यंत्रसामग्री आणि साहित्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि तांत्रिक मानकांची चाचणी करणारी संस्था आहे. निवड झालेल्या यंग प्रोफेश्नल्सना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या दिल्या जातील.
या भरतीमध्ये सिनिअर आणि ज्युनिअर यंग प्रोफेशनलच्या विविध पदांचा समावेश आहे:
सिनिअर यंग प्रोफेशनल: टेक्निकल (RPPT, इलेक्ट्रिकल, सिव्हिल) आणि मॅनेजमेंट (Management).
ज्युनिअर यंग प्रोफेशनल: केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मायक्रोबायोलॉजी, आयटी (IT), एरोस्पेस, ड्रोन आणि RPPT.
सिनिअर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात B.E. / B.Tech किंवा M.Sc. सोबत ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच मॅनेजमेंट पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा MBA सोबत ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. ज्युनिअर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात B.E. / B.Tech, M.Sc., M.Tech किंवा MCA पदवी आणि सामान्यतः १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनुसार (२५ सप्टेंबर २०२६ रोजी):
ज्युनिअर यंग प्रोफेशनल: कमाल वय ३५ वर्षे.
सिनिअर यंग प्रोफेशनल: कमाल वय ३८ वर्षे.
सिनिअर यंग प्रोफेशनल: ₹७०,०००/- प्रति महिना.
ज्युनिअर यंग प्रोफेशनल: ₹४०,०००/- प्रति महिना.
वार्षिक वाढ: कार्यकाळ वाढवल्यास मानधनात प्रतिवर्षी ₹५,००० ची वाढ केली जाईल.
कालावधी: सुरुवातीला १ वर्षाचा कंत्राट असेल, जो कामगिरीच्या आधारावर कमाल ४ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…
१. उमेदवारांनी निश्चित केलेला अर्ज फॉर्म भरणे आवश्यक आहे.
२. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत CV (बायोडेटा) जोडावा.
३. हा अर्ज संबंधित NTH कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर (Email ID) पाठवायचा आहे.
४. गाझियाबाद, कोलकाता, चेन्नई, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जयपूर, गुवाहाटी, बंगळुरू आणि वाराणसी या प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळे ईमेल आयडी देण्यात आले आहेत. उमेदवारांनी संबंधित केंद्राच्याच ईमेल आयडीवर २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज पाठवावा.